Chandrashekhar Bawankule Sarkarnama
मुंबई

BJP Political Breaking : मोठी राजकीय घडामोड! भाजपच्या शिष्टमंडळाने घेतली केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट;'हे' आहे कारण

BJP Leaders Meet Central Election Commission : 'आता निवडणूक आयोगाकडून आम्हाला अपेक्षा आहे की, आगामी विधानसभा निवडणूक चांगली होईल...'

Deepak Kulkarni

BJP Political News : अतिआत्मविश्वासात राहिलेल्या भाजपसह महायुतीला नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत जोरदार फटका बसला.या निवडणुकीतील पराभव भाजपच्या चांगलाच जिव्हारी लागला. त्यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपने या पराभवाचा वचपा काढण्यासह महाविकास आघाडीचं पानिपत करण्यासाठी कंबर कसली आहे.

छोट्या छोट्या चुकांची पुनरावृत्ती टाळण्याकडे भाजपला कल आहे.एकीकडे महाराष्ट्रातलं राजकारण तापलेलं असतानाच दुसरीकडे भाजपच्या शिष्टमंडळानं बुधवारी (ता.24)थेट केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेण्यासाठी दाखल झाले.या भेटीमुळे तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाची भेट घेण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली किरीट सोमय्या,अनुप धोत्रे,हेमंत सावरा,आशिष शेलार यांनी भेट घेतली.एकीकडे महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांबाबतच्या दाखल याचिकांवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच ही भाजपच्या शिष्टमंडळाने निवडणूक आयोगाची भेट घेतल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी निवडणूक आयोगाची भेट घेतल्यानंतर मीडियाशी संवाद साधला. या भेटीत नेमकं काय घडलं याविषयीची माहिती त्यांनी यावेळी दिली. बावनकुळे म्हणाले,या लोकसभा निवडणुकीत आम्हाला वाईट अनुभव आले होते, ते पुन्हा येऊ नये, यासाठी 11 मुद्यांवर आयोगाशी चर्चा केली. आता निवडणूक आयोगाकडून आम्हाला अपेक्षा आहे की, आगामी विधानसभा निवडणूक चांगली होईल असेही त्यांनी सांगितले.

बावनकुळे म्हणाले,केंद्रीय निवडणूक आयोगासमोर मतदारयादी आणि मतदारांचं वय यांसारखे विविध मुद्दे मांडले.आयोगानेही आमचे म्हणणे ऐकून घेतले. महाराष्ट्रातील बूथ आणि मतदारयादी त्यांनी समजून घेतली. मतदारयादीत एका बूथची संख्या ही 1 हजारच्या आत करावी अशी विनंतीही आयोगाला केली.वयोवृद्ध मतदार यांचं वय 85 ऐवजी 75 करावं अशी मागणीही भाजपच्या शिष्टमंडळाने आयोगाकडे केल्याची माहिती बावनकुळे यांनी यावेळी दिली.

आशिष शेलार काय म्हणाले..?

लोकसभा निवडणुकीवेळी वगळण्यात आलेल्या मतदारांच्या नावांचा रिव्ह्यू केला पाहिजे,अशी मागणी आम्ही आयोगाकडे केली. काही ठिकाणी मतदारयादीत परिवार तुटले आहेत त्यांना एकत्र मतदान करण्याची संधी मिळावी असं आमचं म्हणणं आम्ही आयोगासमोर मांडलं.

तसेच बूथपातळीवरील अधिकाऱ्यांकडून काही चुका झाल्याचं त्यांच्या बोलण्यावरून दिसून आलं. महाराष्ट्रात 10 टक्के लोकांना मतदान करता आलं नसून फोटो नसल्यामुळे अनेकांना मतदान करता आले नसल्याची खंतही शेलार यांनी यावेळी बोलून दाखवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT