eknath shinde
eknath shinde sarkarnama
मुंबई

बंड यशस्वी : ठाकरेंकडे उरले १४ आमदार, शिंदेंना ४६ आमदार ६ अपक्षांचा पाठिंबा

सरकारनामा ब्युरो

मुंबई : एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाच्या बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांनी फेसबूक लाईव्ह करत शिवसैनिकांना भावनिक आवाहन केले होते. मुख्यमंत्र्यांच्या या भावनिक आवाहनाला एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी थेट वास्तववादी उत्तर दिले आहे.एकनाथ शिंदे यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारमध्ये शिवसैनिक कसा भरडला गेला, हे सांगताना शिंदे यांनी चार मुद्दे मांडले आहेत. (eknath shinde latest update)

एकनाथ शिंदे यांनी महाविकास आघाडीला आव्हान दिलं आहे. शिवसेनेचे जवळपास ४१ आमदार शिंदे गटात सामील झाल्याचं कळतंय. मुंबई, खान्देश, कोकण आणि मराठवाड्यातील मोठं संख्याबळ एकत्र करण्यात शिंदेंचे बंड यशस्वी झाले आहे. आता ठाकरे यांच्यासोबत फक्त १४ आमदार उरले आहेत. शिंदे गटात आमदारांच्या संख्येत वाढ होत आहे.

अजून काही आमदार सांयकाळपर्यंत त्यांच्या गटात सामील होतील, अशी चर्चा आहे. शिवसेनेचे आमदार दीपक केसरकर यांना शिवसैनिकांनी घरी जाण्यापासून अडवलं होते. त्यानंतर ते आक्रमक झाले आहेत. तेही शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत.

सहा अपक्ष आमदारांमध्ये नरेंद्र भोंडेकर, आशिष जैस्वाल आणि बच्चू कडू गटातले अन्य काही आमदार शिंदेंच्या गटात सामील झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे राज्यातील महाविकासआघाडीचं सरकार अस्थिर झालं आहे. त्यामुळे ठाकरे सरकारवर संकट आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT