Eknath Shinde latest news updates, Maharashtra Political Crisis News  sarkarnama
मुंबई

शिंदेंकडून सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु ; प्रवक्तेपदी गोगावले, बच्चू कडू यांची नियुक्ती

एकनाथ शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली जोरात सुरु आहेत. शिंदे गटाचं चर्चेसाठी एक शिष्टमंडळ तयार केलं आहे.

सरकारनामा ब्युरो

गुवाहाटी (आसाम) : शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीमुळे राज्याच्या राजकारणात अस्थिरता निर्माण झाली आहे. सध्या गुवाहाटीत शिंदे गटासह शिवसेनेचे जवळपास ४० पेक्षा अधिक आमदार उपस्थित आहेत. त्याचबरोबर अनेक बंडखोर आमदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची मागणी मुख्यमंत्री आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे. (Eknath Shinde news update)

तर दुसरीकडे शिंदे गटाच्या प्रवक्तेपदी भरत गोगावले आणि बच्चू कडू यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सुत्रांनी दिली. एकनाथ शिंदे गटाकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली जोरात सुरु आहेत. शिंदे गटाचं चर्चेसाठी एक शिष्टमंडळ तयार केलं आहे. या शिष्टमंडळात शंभूराज देसाई, दादा भुसे, भरत गोगावले, बच्चु कडू यांचा समावेश आहे. शिंदे गटाची भूमिका स्पष्ट करण्यासाठी शिष्टमंडळात प्रवक्ते देखील असणार आहेत. आज ते महाविकास आघाडीचा पाठिंबा काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

गुवाहाटी येथे एकनाथ शिंदे गटाची काल बैठक झाली. आमदारांना आपापल्या मतदारसंघात मेळावे घेण्याचे आदेश शिंदे यांनी काल बैठकीत दिले. सभेतून बाळासाहेबांचे हिंदुत्वाचे विचार पुढे न्या. आम्ही शिवसेनेत आहोत. स्वतःबद्दलचे गैरसमज दूर करा तसेच सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र या असेही ते म्हणाले.

लोकांना सांगा की तुमची भूमिका पहिल्यापासून हिंदुत्वाची आणि मराठीची आहे. उद्धव ठाकरे यांनी काल विभागप्रमुखांची बैठक घेण्याचे आदेश दिले होते. आता एकनाथ शिंदे यांनीही उद्धव ठाकरेंपाठोपाठ आपल्या आमदारांना सभा आणि रॅली काढण्याचे आदेश दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT