Eknath Shinde  Sarkarnama
मुंबई

ठाण्यात शिवसेनेला मोठं खिंडार : ६६ माजी नगरसेवक शिंदे गटात

ठाण्यातील सर्व नगरसेवक आणि कार्यकर्ते हे आज एकनाथ शिंदे यांच्या बाजूने उभे आहेत हे यातून दिसून येत आहे.

सरकारनामा ब्युरो

मुंबई : ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांनी शिवसेना (shivsena) जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा दिल्यानंतर आता ठाण्यातील शिवसेनेचे नगरसेवक शिंदे गटात सामील होत आहेत. नरेश म्हस्के यांच्यासोबत ६६ माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shinde)यांची भेट घेतली. हे ६६ नगरसेवक शिंदे गटात सामील झाले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर मोठ्या संख्येने ठाण्यातील नगरसेवक शिंदे गटात आले आहेत. (Eknath Shinde news update)

नरेश म्हस्के हे ठाण्यातील मोठं नाव आहे. म्हस्के हे सेनेचे ठाण्यातील आक्रमक नेते आहेत. ठाणे महापालिकेचे महापौर म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे. त्यामुळे शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखपदाचा त्यांनी राजीनामा दिल्याने ठाण्यातील कार्यकर्त्यांची नाराजी यातून स्पष्ट दिसून येत होती. ठाण्यातील सर्व नगरसेवक आणि कार्यकर्ते हे आज एकनाथ शिंदे यांच्या बाजूने उभे आहेत हे यातून दिसून येत आहे.

Eknath Shinde &66 Ex Corporators of Shivsena in Thane join Eknath Shinde

शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या मुंबईत शिवसेनेत खिंडार पडण्यास सुरवात झाली आहे. नाराज शिवसैनिक, शाखाप्रमुखांना कसे थांबविणार, असा प्रश्न सध्या उद्धव ठाकरे यांच्यासमोर आहे. अशातच आता शिवसेनेच्या बालेकिल्ल्यातच हादरे बसू लागले आहेत. काल (बुधवारी) मागाठाणे विभागातील दोन शाखाप्रमुखांनी पक्षाच्या पदांचा राजीनामा दिला आहे.

शाखा क्रमांक 3 चे शाखाप्रमुख प्रकाश पुजारी (Prakash Pujari)आणि शाखा क्रमांक 12 चे शाखाप्रमुख कौस्तुभ महामुणकर यांनी शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आहे. महिला शाखा संघटक सुषमा गायकवाड यांनीही पदाचा राजीनामा दिला.आमदारांची बंडखोरी होऊनही आतापर्यंत मुंबईत एकाही शाखाप्रमुखाने उघडपणे राजीनामा दिला नव्हता. या दोन शाखाप्रमुखांनी राजीनामा दिल्याने राजीनामा सत्र सुरु होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

शिवसेना विभागप्रमुख विलास पोतनीस यांना पुजारी यांनी पत्र लिहिलं आहे. या पत्रात प्रकाश पुजारी यांनी म्हटले आहे की, “गेल्या काही दिवसांपासून चालू असलेल्या राजकीय घडामोडी आणि ठाण्याचे आमदार प्रकाश सुर्वे यांच्याशी असलेले माझे घनिष्ठ संबंध पाहता प्रभागातील पदाधिकारी व शिवसैनिक माझ्याकडे नाहक संशयाने पाहत आहेत. परस्परात संभ्रमाचे वातावरण तयार करून माझ्याबाबतीत चुकीचे संदेश पोहचवत आहे. मी याकारणाने माझ्या शाखा प्रमुखपदाचा राजीनामा आपणाकडे सुपुर्त करीत आहे,”

शिवसेनेला पुण्यातही मोठा धक्का बसला आहे. पुण्यातील नगरसेवक नाना भानगिरे हे एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहेत. एकनाथ शिंदे गटाकडून नाना भानगिरे यांच्यावर पश्चिम महाराष्ट्राची जबाबदारी दिली जाणार आहे. नाना भागिरे हे आतापर्यंत पुणे महापालिकेत तीनवेळा नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. त्यांनी तीन वेळा हडपसर मतदारसंघातून विधानसभेची निवडणुक लढवली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT