Uday Samant
Uday Samant  sarkarnama
मुंबई

शिवसेनेचा आणखी एक मंत्री शिंदे गटाच्या गळाला ? ; उदय सामंत गुवाहाटीकडे रवाना..

सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेनेचा एक एक आमदार एकनाथ शिंदे गटात सामील होत आहे. शिवसेनेचे नेते, उच्चशिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) हेही आज (रविवार) सकाळपासून नॉटरिचेबल आहेत. ते गुवाहाटीच्या दिशेने रवाना झाल्याचे समजते. (Eknath Shinde news update)

मागील तीन दिवस रत्नागिरीचे शिवसेनेचे आमदार व राज्याचे उच्च तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत हे मातोश्री व वर्षा बंगल्यावर ठाण मांडून होते. शुक्रवारी सामंत हे मुंबईतून बाहेर पडल्यामुळे ते नेमके कुठ गेलं, याविषयी चर्चांना उधाण आलं होतं.

सामंत हे मुंबईतून बाहेर पडल्यानंतर ते गुवाहाटीला गेले का, असा प्रश्न विचारण्यात येत आहे, याबाबत उदय सामंत यांनी शनिवारी स्पष्टीकरण दिलं की पाली (रत्नागिरी) येथे आहे. याबाबत त्यांनी एक व्हिडिओही शेअर केला होता.

"मी शिवसेनेतच आहे," असे शनिवारी म्हणणारे सामंत अवध्या काही तासातच पुन्हा नॉटरिचेबल झाले आहेत. त्यामुळे आता पुन्हा चर्चांना उधाण आले आहे. ते शिंदे गटात सामील होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सामंत हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतलेल्या शनिवारीच्या बैठकीला उपस्थित होते.

काल (शनिवारी) एका प्रश्नाला उत्तर देताना सामंत म्हणाले,"मी शिवसेनेत आहे. नाहीतर मी गुवाहाटीला गेलो असतो," एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर चौथ्या दिवशी सामंत रत्नागिरीच्या दौर्‍यावर आले होते. कोकणकन्या एक्स्प्रेसने ते रत्नागिरी रेल्वे स्थानकावर उतरून थेट पाली येथील निवासस्थानी आले होते. काल ते मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीला उपस्थित होते.

सामंतांनी आपण मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख यांच्या पाठीशी ठाम असल्याचे यापूर्वी सांगितले आहे. शिवसेना पक्षप्रमुखांनी आतापर्यंत जी जबाबदारी दिली व यापुढेही देतील ती आपण पार पाडणार असल्याचेही सामंत दोन दिवसापूर्वी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT