Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar: मुख्यमंत्री पदाबाबत अजित पवारांचे पुन्हा मोठे संकेत; म्हणाले, 'आधी लोकसभेची निवडणूक, नंतर...'

Maharashtra Politics: अजित पवार यांनी केलेल्या एका सूचक विधानामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

Ganesh Thombare

Raigad News: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबत कधी नाराजीच्या बातम्या येतात, तर कधी ते मुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात असतात. मात्र, आता खुद्द अजित पवार यांनी केलेल्या एका सूचक विधानामुळे पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाच्या चर्चांना उधाण आलं आहे.

"आधी लोकसभेची निवडणूक आहे, त्यानंतर तुमच्या मनात आहे ते होईल", असे म्हणत अजितदादांनी एक प्रकारे मुख्यमंत्री पदाबाबतचे संकेतच दिल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) कर्जतमधील सभेत ते बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यातील आरक्षणाचा विषय ते आपल्याला डेंग्यू झाल्यानंतर झालेली टीका अशा सर्वंच विषयांवर भाष्य केलं.

राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटलेला असतानाच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाल्याच्या बातम्या समोर आल्या होत्या. त्यानंतर मात्र, अजित पवारांना राजकीय डेंग्यू तर झाला नाही ना ? असा सवाल राजकीय वर्तुळातून अनेकजण उपस्थित करत होते. या सर्व चर्चांवर अजित पवारांनी आपल्या खास शैलीत उत्तर दिलं आहे.

"मला डेंग्यू झाला, तेव्हा अजित पवारांना राजकीय डेंग्यू झाला अशी चर्चा झाली. पण मी असा काही मी लेचापेचा माणूस नाही. जे आहे, ते तोंडावर आहे", असा टोला त्यांनी विरोधकांना लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"महाराष्ट्राच्या वातावरणात सध्या वेगळं चित्र पाहायला मिळत आहे. सर्वांना आपला हक्क आणि म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे. पण आपली भूमिका मांडत असताना समाजात तेढ निर्माण होणार नाही, वाद होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. मराठा समाजाला आरक्षण हवं आहे, ओबीसी आरक्षणाला (OBC reservation) धक्का लागू नये, यासाठी भूमिका मांडली जात आहे. आदिवासी, मराठा, धनगर समाजाला आरक्षण मिळावे, असे वाटते. पण सर्व पक्षांची बैठक घेतली आहे, सर्वांनी एकमताने सांगितलं आहे की, सध्याच्या आरक्षणाला धक्का न लावता इतरांना आरक्षणाचा लाभ मिळायला पाहिजे. मतमतांतरे असतील. विचार पटले नाही तर चर्चा व्हायला हवी", असं पवार म्हणाले.

अजित पवारांनी काय संकेत दिले ?

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाची रायगडमधील कर्जतमध्ये बुधवारी निर्धार सभा पार पडली. या सभेत बोलताना उपमुख्यमंत्री पवार यांनी विविध विषयांवर भाष्य केलं. याचवेळी ते भाषण करत असताना काही तरुण खालून घोषणा देत होते. यावर बोलताना "आधी लोकसभेची निवडणूक आहे, त्यानंतर तुमच्या मनात आहे ते होईल", असे म्हणत अजितदादांनी एक प्रकारे मुख्यमंत्री पदाबाबतच संकेत दिले. त्यांच्या या सूचक विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

(Edited By - Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT