📝 3 महत्वाचे मुद्दे (Summary):
दिशा सालियन मृत्यू प्रकरण आणि आरोप: 2020 मध्ये दिशा सालियनच्या मृत्यूनंतर भाजप नेते नारायण व नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप करत नाऱ्को टेस्टची मागणी केली होती.
न्यायालयाची क्लिन चिट: मुंबई उच्च न्यायालयाने हालचाली केल्यानंतर आदित्य ठाकरेंना या प्रकरणात क्लिन चिट दिली असून, पोलिस तपासानुसार दिशा सालियनच्या मृत्यूत हत्या किंवा लैंगिक अत्याचाराचे कोणतेही पुरावे आढळले नाहीत.
राजकीय व सामाजिक पडसाद: कोर्टाच्या निर्णयानंतर वांद्रे येथील मातोश्री बाहेर "हायकोर्टाची चपराक" या मजकुराचे बॅनर झळकले, ज्यामुळे सामाजिक व राजकीय चर्चेला उधाण आले.
Mumbai News: अभिनेता सुशांतसिंह राजपूत याची माजी व्यवस्थापक दिशा सालियन मृत्यूप्रकरणात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते, माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा हात असल्याचा आरोप भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री नारायण राणेंसह नितेश राणे यांनी केला होता. याप्रकरणात आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करावी अशीही मागणी करण्यात येत होती. काही दिवसापूर्वी दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य यांना न्यायालयाने क्लिन चिट दिली आहे.
या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या वांद्रे येथील 'मातोश्री'च्या अंगणात दिशा सालियान प्रकरणाचे बॅनर झळकले आहे. दिशा सालियान केसमध्येआदित्य ठाकरेंवर राजकीय आरोपांचे शिंतोडे उठवणाऱ्यांना हाय कोर्टानाची चपराक असा आशय या बॅनरवर आहे. हे बॅनर सगळ्याचे लक्ष वेधून घेत आहे.
8 जून 2020 रोजी दिशा सालियन हिचा मुंबईतील मालाड येथील एका इमारतीच्या 14 व्या मजल्यावरुन पडून मृत्यू झाला होता. सुरुवातीला दिशाने आत्महत्या केल्याचं मानलं गेलं आणि तिच्या मृत्यू प्रकरणाचा तपास सुरु करण्यात आला.
दिशा सालियन हिची हत्या झाली तसेच तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचे पोस्टमार्टममध्ये सिद्ध झालेले नाही. दिशा हीच्या शरीरावर कोणत्याही प्रकारची लैंगिक किंवा शारीरिक अत्याचाराची खूण आढळली नाही, असे मालवणी पोलिसांनी प्रतिज्ञापत्राद्वारे स्पष्ट केले आहे.
भाजप नेते, आमदार नितेश राणे यांनी दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दिशाची हत्या झाली असून त्या प्रकरणाचे पुरावे गायब करण्यात आले आहेत, असा आरोप राणे यांनी केला होता.
दिशा हिचे वडील सतीश सालियन यांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत या प्रकरणाचा पुन्हा तपास करावा, अशी मागणी केली. आदित्य ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्याची मागणी सतीश सालियन याचिकेत केली होती.
प्रश्न: दिशा सालियन मृत्यू प्रकरणात आदित्य ठाकरे यांना काय निष्कर्ष मिळाला?
उत्तर: न्यायालयाने आदित्य ठाकरे यांना क्लिन चिट दिली आहे.
प्रश्न: दिशा सालियनचा मृत्यू कसा झाला?
उत्तर: ती 14 व्या मजल्यावरून पडून मृत्युमुखी पडली, पोलिसांनी आत्महत्येचा निष्कर्ष दिला.
प्रश्न: दिशाच्या मृत्यूपूर्वी लैंगिक अत्याचाराचे पुरावे आढळले का?
उत्तर: पोस्टमार्टममध्ये लैंगिक अथवा शारीरिक अत्याचाराचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत.
प्रश्न: या प्रकरणावरून काय राजकीय प्रतिक्रिया उमटल्या?
उत्तर: विरोधकांनी आदित्य ठाकरेंवर आरोप केल्याने मोठे राजकीय वादंग निर्माण झाले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.