Eknath Shinde latest news updates, Political Crisis in Maharashtra
Eknath Shinde latest news updates, Political Crisis in Maharashtra  
मुंबई

''हॅलो.. मी एकनाथ शिंदे बोलतोय'': अखेर कॉल केलाच...

सरकारनामा ब्युरो

मुंबई : गेल्या तीन-चार दिवसांपासून राजकारणात नाट्यमय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेच्या ३५ हून अधिक आमदारांना सोबत घेऊन बंड पुकारले आहे. ज्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकारचे भविष्यही धोक्यात आले आहे. (Eknath Shinde latest news update)

ठाणे जिल्ह्यात एकनाथ शिंदेंचा मोठा दबदबा आहे. विशेष म्हणजे ठाणे जिल्हा हा एकनाथ शिंदेंचा बालेकिल्ला मानला जातो. पण एकनाथ शिंदेंनी बंड पुकारल्यापासून ठाणे, कल्याण, डोंबिवलीतील शिवसैनिकांमध्ये प्रचंड अस्वस्थता आहे. एकनाथ शिंदेच्याविरोधात काही शिवसैनिक आक्रमक झाले असताना दुसरीकडे मात्र ठाणे जिल्हा मात्र शांतच आहे. ठाण्यातील शिवसैनिकांच्या मनाची घालमेल सुरू असतानाच अचानक गुरुवारी (२३ जून) एकनाथ शिंदेंचाच फोन डोंबिवलीत खणाणला. डोंबिवलीतील एका खासगी रुग्णालयात त्यांनी फोन केला होता. त्याच कारणही तसंच आहे. (Political Crisis in Maharashtra)

त्यांच्या फोन नंतर कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव दिसून आले याला कारणही तसं भावनिक आहे. दोन तीन दिवसांपूर्वी ज्येष्ठ शिवसैनिक आणि डोंबिवलीतील उपशहरप्रमुख राम मिराशी यांची २१ जूनला अचानक तब्येत बिघडल्याने खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मिराशी यांच्यावर अतिदक्षता विभागात मिराशी यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती एकनाथ शिंदेंना मिळाली.

त्यानंतर शिंदेंनी तातडीने गुरुवारी संध्याकाळी साडे पाच वाजता थेट रुग्णालयातील डॉक्टरांना फोन लावला. ''हॅलो डॉक्टर..मी एकनाथ शिंदे बोलतोय.. आमचा एक कार्यकर्ता आपल्या रुग्णालयात उपचार घेत आहे. त्यांची काळजी घ्या, त्यांना काही लागलं तर सांगा... माझा कार्यकर्ता जगला पाहिजे ही विंनती...'', अशी विनंती करण्यासाठी कॉल केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT