येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आम्ही युती म्हणून लढवणार असल्याची माहिती मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात आज पत्रकारांशी संवाद साधत असताना त्यांनी हे महत्वपूर्ण विधान केले.
केंद्राकडे मुख्यमंत्र्यांची १८ हजार कोटींची मागणी
ज्यावर असलेले कर्ज पाहता विकासासाठी निधी उपलब्ध होण्यासाठी निती आयोगांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी १८ हजार कोटींची मागणी केली आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी सकारात्मक असून केंद्र आणि राज्य एक विचाराचे असल्याने राज्याच्या विकासाला गती येईल, असा विश्वास मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.
शंभूराज देसाई यांनी आज विविध विभागाची आढावा बैठक घेतली. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ते म्हणाले, मागील सरकारने शेवटच्या दीड महिन्यात काही कामांना तातडीने मान्यता दिल्या आहेत. त्याविषयी आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी केल्याने या कामांना स्थगिती दिली आहे. लवकरच ही कामे मार्गी लागतील. महाबळेश्वर, कास, पर्यटन विकासावर विशेष भर राहणार असून जलसंपदा प्रकल्पांना निधी देऊन ते मार्गी लावलेजातील. रस्ते जाळे, अधिक चांगल्या प्रकारे होण्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळविला जाईल.
मंत्री गुलाबभाऊ तुमच्या कार्यकर्त्यांचं हे वागणं बर आहे का? मंत्री महोदय हे काय कितपत योग्य आहे, असा सवाल विचारण्याची वेळ आज जळगावाकरांवर आली. मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर गुलाबराव पाटील आज पहिल्यांदाच जळगाव दाखल झाले त्यांच्या स्वागतासाठी त्यांच्या कार्यकर्त्यांसह पदाधिकाऱ्यांचा प्रचंड उत्साह यावेळी पाहायला मिळाला. हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
यादरम्यान मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाहनाच्या ताफ्यामागे शेकडो कार्यकर्त्यांची वाहने असल्याने अंमळनेर ते जळगाव पर्यंत महामार्गावर वाहतुकीची कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे बेफान झालेल्या मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी धावत्या वाहनात खिडकीवर बसून तसेच वाहनाच्या टपावर बसून जीवघेणी स्टंटबाजी केल्याचेही यावेळी पाहायला मिळाला. प्रचंड वाहतूक कोंडीमुळे नागरिकही शाळकरी मुलं यासह महिला तसेच वाहनधारकांची यावेळी प्रचंड गैरसोय झाल्याचे पाहायला मिळालं .चक्क वाहनाच्या टपावर बसून तरुण ढोल आणि ताशे वाजवत असल्याचंही चित्र यावेळी पाहायला मिळालं.
वाहतुकीची कोंडी सोडत सोडवत तसेच स्टंटबाजी करणाऱ्या या कार्यकर्त्यांमुळे हैराण झाल्याचे तसेच पोलीस कर्मचाऱ्यांना नाकी नऊ आल्याचा पाहायला मिळालं.
आपण परत गुलामगिरीकडे चाललो का? प्रत्येक माणसाचे मत एकच असेल असे नाही. परंतु ८-१० दिवसापूंर्वी नड्डांनी जे वक्तव्य केले ते लोकशाहीला घातक. एकच पक्ष टिकणार इतर पक्ष संपणार. त्यांच्या प्रदेशाध्यक्षांच्या नावात किती कुळ मला.माहित नाही पण किती कुळ आली तरी शिवसेना संपणार नाही. सगळे मिळून संघ राज्य पद्धत. प्रादेशिक पक्ष संपवायचे हे नड्डांचे मत आहे का? अमृत महोत्सव अमृतासारखा असायला हवा. सध्या सोशल मिडियाचा जमाना पण ते सोसल का? लष्करात कपात करण्याची बातमी धोकादायक. लष्कर प्रचंड असायलाच हवे. चीन अमेरिका यांनी आधुनिकीकरण साठी सैन्य कपात केल्याचे ऐकिवात नाही. सरकार पाडायला पैसे आहेत पण लष्करासाठि नाही. नुसता तिरंगा लावून चीन परत जाणार का? घरावर तिरंगा हा लषकराला वाटायला हवे आम्ही सोबत आहोत. मला आज राजकीय बोलायचे नाही. पण महाराष्ट्रात आपत्ती असतांना सरकारचा पत्ता नाही मंत्र्यांचा पत्ता नाही मौज मजा सुरु आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आज होते. येथे त्यांच्या गटातील आमदारांच्या भेटी घेण्यासोबतच त्यांनी काॅंग्रेसच्या गोटातही खळबळ उडवून दिली आहे. काँग्रेस नेते, माजी कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम यांच्यात बंद खोलीमध्ये अर्धा तास चर्चा आज झाली. शिंदे यांनी सांगलीत भारती विद्यापीठला भेट दिली. या वेळी दोघांमध्ये बंद खोलीत अर्धा तास चर्चा झाली. या भेटीचा तपशील समजू शकला नाह तरी त्यावरून अनेकांच्या राजकीय भुवया उंचावल्या आहेत. कदम यांचे सासरे अविनाश भोसले हे सध्या केंद्रीय तपास यंत्रणांच्या ताब्यात आहेत. या विषयावर काही चर्चा झाली का, असाही प्रश्न उपस्थित झाला आहे.
शिवसेनेचे आमदार अनिल बाबर यांच्या पत्नीचे नुकतेच निधन झाले. शिंदे यांनी बाबर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे सांत्वन केले.
-शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रतोद भरत गोगावले यांचे मोठे विधान
-उद्धव ठाकरे यांच्यावर शरद पवारांनी काय, कुठे लिंबू फिरवला, कोणत्या भक्ताकडे गेले मला माहिती नाही.
-शिवसेनेतील बंडखोरी दरम्यान शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राष्ट्रवादीला जवळ केले यावर आ. गोगावले यांचे मोठे विधान
- रायगड जिल्ह्यातील गोरेगाव येथील शिवसेना मेळाव्यात आ. गोगावले बोलत होते.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जून महिन्यात आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. या राजीनाम्याच्या वेळीच त्यांनी आपल्या आमदारकीचा म्हणजे विधान परिषद सदस्यत्वाचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. मात्र आता दोन महिने झाली तरी त्यांनी आपला आमदारकीचा राजीनामा सभापतींकडे पाठविलेला नव्हता.
आता नवीन रणनीतीनुसार ठाकरे हे आमदारकीचा राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीचे नेते अजित पवार, जयंत पाटील हे ठाकरे यांना नुकतेच भेटले होते. त्या वेळी ठाकरे यांना राजीनामा न देण्याचा सल्ला देण्यात आला हा सल्ला मानण्याचे ठाकरे यांनी ठरविले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे हे विधान परिषदेत आगामी पावसाळी अधिवेशनात उपस्थिती लावणार का, याची उत्सुकता राहणार आहे. हे अधिवेशन 17 ऑगस्टपासून सुरू होत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.