Uddhav Thackeray, Raj Thackeray, Gunratan Sadavarte  Sarkarnama
मुंबई

MNS Shivsena UBT alliance : मनसे-ठाकरे गट युतीच्या चर्चांवरून सदावर्तेंनी ठाकरे बंधूंची खिल्ली उडवली; म्हणाले, "दोघांचे पक्ष गल्लीतून..."

Gunratan Sadavarte On MNS Shivsena UBT alliance : राज्याच्या राजकारणात आता नवं समीकरण उदयास येणार का? याबाबतच्या चर्चांना कालपासून उधाण आलं आहे. त्याचं कारण म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाण्याची तयारी दर्शवली आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 20 Apr : राज्याच्या राजकारणात आता नवं समीकरण उदयास येणार का? याबाबतच्या चर्चांना कालपासून उधाण आलं आहे. त्याचं कारण म्हणजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या हितासाठी ठाकरेंच्या शिवसेनेसोबत जाण्याची तयारी दर्शवली आहे.

तर राज यांनी साद घालताच उद्धव ठाकरेंनी देखील त्यांना प्रतिसाद दिला. मी देखील किरोकोळ भांडणे बाजूला ठेवायला तयार असल्याचं म्हणत त्यांनी अटीशर्थींसह मनसेसोबत युतीचे संकेत दिले. त्यामुळे आता दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणार का? याबाबतची चर्चा संबंध देशभरात सुरू झाली आहे.

मात्र, अशातच आता दोन्ही ठाकरे बंधूंवर वकील गुणरत्न सदावर्ते यांनी हल्लाबोल केला आहे. सदावर्ते यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चा म्हणजे प्रोडक्शन हाऊसमधील चित्रपटाप्रमाणे ही बातमी तयार करण्यात आली असल्याचं म्हणत दोघांची खिल्ली उडवली.

मागील काही दिवसांपासून सदावर्ते राज ठाकरे यांच्यावर टीका करत आहेत. मराठी आणि हिंदी वादावरूनही त्यांनी राज (Raj Thackeray) यांना लक्ष्य केलं होतं. अशातच आता त्यांनी पुन्हा एकदा राज यांच्यासह उद्धव ठाकरेंना देखील डिवचलं आहे.

सदावर्ते नेमकं काय म्हणाले?

ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्याच्या चर्चांवर प्रतिक्रिया देताना गुणरत्न सदावर्ते म्हणाले, "ठाकरे बंधू एकत्र येणार ही एखाद्या प्रोडक्शन हाऊसमधील चित्रपटाप्रमाणे बातमी तयार करण्यात आली आहे. महेश मांजरेकरांकडून ठाकरे बंधूंनी चित्रपट बनवला आहे.

एक बात कहूंगा, उद्धव ठाकरे, राज ठाकरे कन्फ्यूज आहेत. राजकारण काय कौटुंबिक असते का? असा सवाल करत उध्दव ठाकरेंचं राजकारण भाईजानचं आहे. तर राज गले मिलो म्हणत असतील तर हे दोघंही करमणुकीचं साधण झाले आहेत.

शिवाय राज यांच्याकडे विधानसभेत एकही आमदार नाही आणि उद्धव यांच्याकडे किती लोक राहातील ते माहिती नाही. दोघांचे पक्ष हे गल्लीतील असून ते गल्लीतून घरापर्यंत जातील, असा टोला त्यांनी यावेळी दोघांना लगावला. तर हिंदी भाषेच्या अपयशानंतर यांनी गले मिलो सुरू केलं आहे, असं म्हणत दोघांना टोला लगावला.

२५ वर्षे पूर्ण करणारा ई-सकाळ आता का्ॅमस्कोअरमध्ये नंबर १. डिजिटल माध्यमांच्या क्षेत्रातली नवी झेप

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT