BJP leader Madhuri Misal and Shiv Sena’s Sanjay Shirsat at loggerheads over social justice meetings, intensifying Mahayuti coalition tensions. Sarkarnama
मुंबई

Devendra Fadnavis warning : मंत्र्यांमधील वाद चव्हाट्यावर येताच फडणवीसांनी ठणकावलं; शिरसाट यांच्या मुळ मुद्द्यावरच घाव...

Minister Sanjay Shirsat and MLA Madhuri Misal Clash Publicly : माधुरी मिसाळ यांनी नुकतीच सामाजिक न्याय विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यावरून संतापलेल्या संजय शिरसाट यांनी त्यांना इशारा वजा सूचना देणारे पत्रच पाठवले होते.

Rajanand More

Maharashtra Politics : सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला आहे. या वादाची मागील दोन दिवसांपासून राजकीय वर्तूळात सुरू आहे. मिसाळ यांनी नुकतीच विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यानंतर शिरसाट यांनी खरमरीत पत्र लिहित त्यांना राज्यमंत्रिपदाच्या मर्यादा लक्षात आणून दिल्या होत्या. त्याला मिसाळ यांनीही पत्रातूनच प्रत्युत्तर दिलं होतं.

दोन्ही नेत्यांमधील वादावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी आपली भूमिका स्पष्ट केली. त्यांनी राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा अधिकार असल्याचे स्पष्टपणे सांगितले. ते म्हणाले, अशाप्रकारे पत्र लिहून कुणीही वाद तयार करू नये. मंत्र्यांनी आपआपसात बोलावं. मंत्र्यांना काही अडचणी असतील तर मला येऊन बोलावं, म्हणजे त्यातील अडचणी दूर करता येतील.

शेवटी मंत्री आणि राज्यमंत्री हे दोघेही एकाच शासनाचे भाग असतात. सगळे अधिकार हे मंत्र्यांकडेच असतात. मंत्री जे अधिकार देतात, ते राज्यमंत्र्यांचे अधिकार असतात. मुळात यात कुठलाही संभ्रम नाही. मात्र, राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा अधिकार नाही, असे म्हणणेही चुकीचे आहे. राज्यमंत्र्यांना बैठका घेण्याचा पूर्ण अधिकार आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

बैठकांमध्ये जर काही धोरणात्मक निर्णय असतील तर ते धोरणात्मक निर्णय हे मंत्र्यांशी बोलल्याशिवाय घेता येत नाहीत किंवा ते घेतले तर त्याला मंत्र्यांची मान्यता घ्यावी लागते. मंत्री आणि राज्यमंत्री या दोघांनीही सामंजस्य दाखवलं पाहिजे. काही अडचण असेल तर माझ्याशी बोलावं, असा सल्लाही फडणवीसांनी मंत्र्यांना दिला.

काय आहे वाद?

माधुरी मिसाळ यांनी नुकतीच सामाजिक न्याय विभागातील अधिकाऱ्यांची बैठक घेतली होती. त्यावरून संतापलेल्या शिरसाट यांनी त्यांना इशारा वजा सूचना देणारे पत्रच पाठवले होते. यापुढे माझ्या अध्यक्षतेखाली बैठका घ्यावीत, असे शिरसाट यांनी पत्रात स्पष्टपणे म्हटले होते.

त्यावर मिसाळ यांनीही पत्र लिहित आपण बैठका घेऊन कोणतीही ढवळाढवळ केली नसल्याचे स्पष्ट केले होते. 'मी घेतलेल्या आढावा बैठकामध्ये कोणतेही निर्णय घेतलेले नाही व निर्देश दिले नाहीत. राज्यमंत्री म्हणून मी घेतलेल्या बैठकामध्ये निदर्शनास आलेल्या बाबींबद्दल अधिकाऱ्यांना काही सूचना करणे किंवा निर्देश देण्यात काहीही गैर नाही, अशी माझी धारणा असल्याचे मिसाळ यांनी म्हटले होते. 

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT