Prithviraj Chavan Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politics : ठाकरे बंधू अन् दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास काँग्रेसची भूमिका काय? पृथ्वीराज चव्हाणांनी स्पष्टच सांगितलं

Prithviraj Chavan Statement : मराठीच्या मुद्द्यावरून राज आणि उद्धव हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचंही बोललं जात आहे. याच सर्व राजकीय चर्चांवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे.

Jagdish Patil

Mumbai News, 03 Jul : मराठीच्या मुद्द्यावरून राज आणि उद्धव हे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. तर दुसरीकडे शरद पवार आणि अजित पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार असल्याचंही बोललं जात आहे.

याच सर्व राज्यातील राजकीय घडामोडी आणि चर्चांवर माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी काँग्रेसची भूमिका स्पष्ट केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकत्र आल्यास त्यांच्यासोबत युती ठेवणं अवघड होईल, असं त्यांनी म्हटलं आहे.

शिवाय काँग्रेस आघाडीच्या मुद्द्यावर केवळ उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याशीच चर्चा करेल, असंही त्यांनी सांगितलं. तसंच यावेळी चव्हाण यांनी दोन्ही ठाकरे बंधूच्या एकत्र येण्यावरही भाष्य केलं.

ते म्हणाले, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येणे हा कौटुंबिक विषय आहे. मात्र, ते एकत्र आल्यास पूर्वीची शिवसेनेची मते एकत्र होतील शिवाय त्यांना त्याचा फायदा होईल. पण राज ठाकरे हे मोठी गर्दी खेचणारे नेते आहेत. मात्र, त्याचे मतांमध्ये रूपांतर होत नाही. म्हणून सध्याच्या विधानसभेत त्यांचे अस्तित्व नाही.

दरम्यान, ठाकरे बंधुंप्रमाणे राष्ट्रवादीच्या या दोन्ही गटांचे विलीनीकरण हा देखील त्यांचा कौटुंबिक मुद्दा आहे. मात्र, राष्ट्रवादी एनडीए सोबत गेली तर महाराष्ट्रात काँग्रेसला त्यांच्यासोबत युती कायम ठेवणे अवघड होईल, असंही चव्हाण यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे दोन्ही गट एकत्र आल्यास राज्यातील आघाडी संपुष्टात येणार असल्याचे स्पष्ट संकेत चव्हाण यांनी दिले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT