Leaders from Congress, Shiv Sena (UBT), and NCP intensify negotiations ahead of the Maharashtra Rajya Sabha Election 2026 Sarkarnama
मुंबई

Rajya Sabha Election : राज्यसभा निवडणुकीसाठी अखेर उद्धव ठाकरेंना दिल्लीतून फोन; 'तो' फॉर्म्युला मान्य केल्यास विधान परिषदेचा तिढा देखील सुटणार

Maharashtra Rajya Sabha Election 2026 : राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपद कायम राखण्यासाठी संबंधित पक्षाकडे एकूण सदस्यसंख्येच्या किमान 10 % जागांची आवश्यकता असते. सध्याचं संख्याबळ पाहता यासाठी काँग्रेसचे किमान 25 सदस्य राज्यसभेत असणे गरजेचं आहे. आता काँग्रेसकडे 27 सदस्य आहेत.

Jagdish Patil

Mumbai News, 03 Mar : राज्यसभेच्या 37 जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. या 37 पैकी महाराष्ट्रात राज्यसभेच्या 7 जागा आहेत. या सात जागांसाठी 16 मार्च रोजी मतदान होणार आहे. महाराष्ट्रातील सध्याचं संख्याबळ पाहता महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ एक जागा येणार आहे.

मात्र, या एका जागेवरून राज्यातील राजकारणाची सूत्रं वेगाने फिरत आहेत. कारण एकीकडे ठाकरेंच्या शिवसेनेने या जागेवर दावा केला आहे. तर दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी देखील या जागेसाठी मोठं लॉबिंग करताना दिसत आहे. हे दोन्ही पक्ष मैदानात असतानाच आता काँग्रेसने देखील या जागेसाठी हालचाल सुरू केली आहे.

यासाठीच काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी ठाकरेंच्या शिवसेनेचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांना थेट दिल्लीतून फोन केला आहे. फोनवर चेन्नीथला यांनी राज्यसभेची जागा काँग्रेससाठी सोडण्याची विनंती केली आहे. शिवाय या बदल्यात ठाकरेंना विधान परिषदेची रिक्त होणारी जागा देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे.

त्यामुळे आता निवडणूक जसजशी जवळ येईल तसं वेगवेगळे ट्विस्ट निर्माण होत आहेत. दरम्यान, काँग्रेसने ही जागा आपल्याकडे ठेवण्यामागे मोठ्या रणनीती आहे. कारण राज्यसभेतील विरोधी पक्षनेतेपद टिकवून ठेवण्यासाठी काँग्रेसला महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या वाट्याला येणारी जागा गरजेची आहे.

त्यामुळेच काँग्रेसने या एकमेव जागेवर दावा केल्याची माहिती आहे. काँग्रेसच्या प्लॅननुसार ती जागा काँग्रेसला मिळाली तर राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसच्या नेतृत्वात 'इंडिया' आघाडी आणि महाराष्ट्रात ठाकरेंच्या नेतृत्वात मविआ टिकवण्यास मदत होईल.

दरम्यान, राज्यसभेत विरोधी पक्षनेतेपद कायम राखण्यासाठी संबंधित पक्षाकडे एकूण सदस्यसंख्येच्या किमान 10 % जागांची आवश्यकता असते. सध्याचं संख्याबळ पाहता यासाठी काँग्रेसचे किमान 25 सदस्य राज्यसभेत असणे गरजेचं आहे. आता काँग्रेसकडे 27 सदस्य आहेत. मात्र, आता होणाऱ्या निवडणुकीनंतर हे संख्याबळ 25 च्या खाली जाण्याची शक्यता आहे.

जूनमध्ये मल्लिकार्जुन खर्गेंचा कार्यकाळ संपत असल्यामुळे खर्गे यांचे पद वाचवण्यासाठी काँग्रेस महाराष्ट्रातील एक जागा मिळवण्यासाठी धडपड करत आहे. त्यामुळे आता दिल्लीतून ठाकरेंना फोन आला असला तरी आता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्या पक्षात काय चर्चा होणार आणि ते काँग्रेसच्या प्रस्तावाला होकार देणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT