Uddhav Thackeray |
Uddhav Thackeray | 
मुंबई

Thane Politics : ‘महाराष्ट्र योद्धा उद्धव ठाकरे’! ठाण्यातच बॅनरबाजीतून मुख्यमंत्र्यांनाच आव्हान?

सरकारनामा ब्युरो

Uddhav Thackeray news मुंबई : ठाणे हा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्या गटाचा संघर्ष दिवसेंदिवस वाढत चालल्याचे दिसत आहे. अशातच एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात म्हणजेच ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ जोरदार बॅनरबाजी पहायला मिळत आहे. ठाकरे समर्थनार्थ लावलेल्या या बॅनरच्या माध्यमातून एकप्रकारे एकनाथ शिंदेंनाच आव्हान दिल्याचं बोललं जात आहे.

ठाणे एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला मानला जातो. शिंदे यांच्या बंडखोरीनंतर काही दिवसांनी ठाकरे गटाच्या ठाणे महापालिकेतील जवळपास सर्वच माजी नगरसेवक शिंदे गटात सामील झाले होते. पण आता अचानक ठाण्यात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या समर्थनार्थ जोरदार बॅनरबाजी करण्यात आली आहे. 'महाराष्ट्र योद्धा' असा या बॅनरवर उद्धव ठाकरे यांचा उल्लेख करण्यात आला असून सध्या हे बॅनर सध्या ठाण्यात चर्चेचा विषय ठरले आहेत. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे यांचे बॅनर लागले आहे.

ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या समर्थनार्थ लावण्यात आलेल्या या बॅनरवर उद्धव ठाकरे यांचा महाराष्ट्र योद्धा असा उल्लेख करण्यात आला आहे. यासोबतच ‘न झुकणारा न वाकणारा दिल्लीश्वरांच्या अन्यायी महाशक्तिला महाराष्ट्राच्या स्वाभिमानी वृत्तीने आव्हान देणारा बाळासाहेबांच्या संघर्षमय विचारांचाच खरा वारसदार उद्धव ठाकरे’ असा या बॅनरवर मजकूर छापला आहे. या बॅनरवरून आता ठाण्यात एकप्रकारे उद्धव ठाकरे यांना समर्थन वाढल्याचं दिसत आहे.

एकीकडे ठाण्यात उद्धव ठाकरेंच्या समर्थनार्थ बॅनर लावले जात असताना डोंबिवली शहरात या दोन्ही गटांमध्ये शाखेच्या ताब्यावरून मोठा वाद उफाळून आला आहे. शिंदे शिंदे गटाने डोंबिवलीतील मध्यवर्ती शाखा ताब्यात घेतली आहे. डोंबिवली शहरामध्ये शिससेनेचे कार्यालय ताब्यात घेण्यावरून आता ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार खडाजंगी झाले. यावेळी दोन्ही गटाच्या नेत्यांमध्ये वाद होण्याची शक्यता होती. दोन्हीकडचे नेते हमरी तुमरीवर आले होते. मात्र या ठिकाणी वेळीच पोलीस आल्याने राडा झाला नाही. होणारा अनर्थ टळला. पोलिसांनी यात हस्तक्षेप करत जमावाला रोखले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT