Yashomati Thakur
Yashomati Thakur 
मुंबई

शरद पवारांमुळे महाविकास आघाडी सरकार मजबूत : यशोमती ठाकूर

सरकारनामा ब्युरो

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्यामुळे राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार मजबूत आणि जोरात काम करत आहे, अशा शब्दांत राज्याच्या महिला महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर (Yashomati Thakur) यांनी राज्यातील महाविकास आघाडीबाबत भाष्य केले. ज्यामुळे शरद पवार यांच्याकडेच महाविकास आघाडीचे रिमोट असल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित राज्य महिला आयोगाच्या (Maharashtra State Commission for Woman) 29 व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी यशोमती ठाकूर यांनी राज्यातील महिला धोरण आणि महिला सुरक्षितता या विषयांवर उपस्थितांशी संवाद साधला.

महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांमध्ये सरकार चालवताना चढाओढ सुरु असल्याचे बोलले जाते. मात्र चर्चा कितीही झाल्या तरी शरद पवार यांच्यासारख्या नेत्यामुळेच महाविकास विकास आघाडीचे सरकार राज्यात ताकदीने काम करत असल्याचे यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

त्याचप्रमाणे राज्यात महिला धोरणांचीही प्रभावी अंमलबजावणी झाली पाहिजे. मात्र आपल्याकडे या धोरणाला महत्त्व दिले जात नाही. इतर ठिकाणी ते अमलात आणले जाते. कर्नाटकमध्ये प्रत्येक २५ किलोमीटर अंतरावर महिलांसाठी स्वच्छतागृहे आहेत. मग ती महाराष्ट्रातही असायला हवी. पण आता आपण या सर्व गोष्टींकडे लक्ष देणार असल्याचही त्यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT