लोकसभेनंतर विधानसभेकडे सगळ्याचं लक्ष लागलं आहे. लोकसभेचा 'कॉन्फिडन्स' घेऊन विधानसभा निवडणुकीत सत्ता खेचून आणण्यासाठी महाविकास आघाडी सज्ज झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठका पार पडल्या. या बैठकीत 60 टक्के जागांवर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ), शिवसेनेचं ( ठाकरे गट ) ठरलं असल्याचं माहिती मिळत आहे.
2019 मध्ये नंतर महाराष्ट्रातील राजकीय गणिते बदलली. शिवसेना ( ठाकरे गट ), राष्ट्रवादी ( शरदचंद्र पवार ) आणि काँग्रेसनं ( Congress ) एकत्र येत महाविकास आघाडी स्थापन केली. आजपर्यंत राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं शिवसेनेविरुद्ध निवडणुका लढल्या होत्या. त्यामुळे जागावाटपाचा तिढा कसा सोडवणार? असा प्रश्न पडला होता. तसेच, लोकसभेप्रमाणे विधानसभेलाही अनेक मतदारसंघात 'सांगली पॅटर्न'ची भीती आहे. मात्र, बऱ्याच जागांवर महाविकास आघाडीनं तोडगा काढल्याचं सांगितलं जात आहे.
कसा असेल फॉर्म्युला?
राज्यात 288 विधानसभा मतदारसंघ आहे. त्यातील 100 जागा काँग्रेस, 100 जागा ठाकरेंची शिवसेना, तर 84 जागा शरद पवार यांची राष्ट्रवादी लढणार असल्याचं बोललं जात आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील मित्रपक्षांना एकही जागा देण्यात आली नव्हती. मात्र, विधानसभेत त्यांचा विचार करण्यात आला असून 4 जागा सोडण्याची तयारी दर्शवल्याचं सांगण्यात येत आहे. अजूनही काही जागांवर तिढा कायम असून तो लवकरच सोडवला जाणार आहे.
120 ते 130 जागांवर एकमत?
120 ते 130 जागांवर महाविकास आघाडीतील तीनही पक्षांमध्ये सहमती झाल्याचं बोललं जात आहे. तिढा असलेल्या जागांवर दुसऱ्या टप्प्यात चर्चा केली जाणार आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जिंकलेल्या जागाच त्या पक्षाला दिल्या आहेत. दहा ते वीस जागांवर अदलाबदल केला जाणार असल्याची माहिती आहे.
तीनही पक्षांकडून कंपनी नेमणार...
तीन दिवस पार पडलेल्या बैठकीत विदर्भ सोडून मुंबई-कोकण, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्रातील जागांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. तिढा असलेल्या जागांवर तीनही पक्षांकडून एखादी कंपनी नेमून पक्षाची ताकद जाणून घेतली जाणार आहे. पुढील बैठकीत विदर्भातील जागांवर चर्चा होणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.