Ajit Pawar news
Ajit Pawar news  Sarkarnama
मुंबई

Mahavikas Aghadi : विरोधकांच्या बैठकीत आज 'महाराष्ट्र बंद'ची तारीख निश्चित होणार?

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांनी नुकतेच छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केले होते. यानंतर याचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले होते. विरोधकांकडून राज्यपाल यांना हटवण्याची मागणी केली. मात्र अद्यापही राज्यपालांवर कोणतीही कारवाई केली गेली नाही. यामुळे आता विरोधी पक्षांकडून राज्यपालांना हटवण्यात यावे, ही प्रमुख मागणी करत महाराष्ट्र बंदची हाक दिली होती.

आजच्या विरोधी पक्षांच्या बैठकीत महाराष्ट्र बंदबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. महाविकास आघाडीतील प्रमुख पक्ष व विविध घटक पक्षांच्या गटनेत्यांची मुंबईत विधानभवन येथे विरोधीपक्षनेते अजित पवार यांच्या दालनात आज बैठक पार पडणार आहे. या बैठकीत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या विरोधात महाराष्ट्र बंद आंदोलन करण्यासाठी तारीख निश्चित केली जाण्याची शक्यता आहे.

या बैठकीमध्ये नागपूर येथे होणाऱ्या हिवाळी अधिवेशनातील विरोधी पक्षांच्या रणनीतीवरही विविध नेते चर्चा करणार आहेत. याबाबतचे नियोजन, अधिवेशनात उपस्थित केले जाऊ शकणारे मुद्दे, इत्यादी बाबत रणनीती आखण्यात येणार आहे.

राज्यपालांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून राज्यभर आंदोलनं झाली होती, यापूर्वीच शिवसेना ठाकरे गटाकडून महाराष्ट्र बंदचे सुतोवाच दिले गेले होते. याविषयी मित्र पक्षाची ठाकरे गटाची चर्चा सुरु होती. आजच्या बैठकीत महाराष्ट्र बंद करण्याविषयी तारीख निश्चित होईल अशी दाट शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT