Mahayuti Government .jpg Sarkarnama
मुंबई

Mahayuti Ministers: कितीहा हावरटपणा... टुमदार बंगला मिळाला, तरी मंत्र्यांचा आमदार निवासातील रुममध्ये अडकला जीव, नव्या आमदारांची अडचण

Maharashtra Mahayuti Minister Bungalow Allotment : एकीकडे आमदारांची संख्या जास्त आणि आमदार निवासस्थानामधील रूम कमी अशी परिस्थिती असताना काही मंत्री महोदयांकडून शासकीय बंगल्यासोबतच आमदार निवासातील रूमही ठेवली आहे.त्यामुळे नव्या आमदारांना रूम मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Deepak Kulkarni

Mumbai News : महायुती सरकार पुन्हा एकदा सत्तेत आल्यानंतर भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना पक्षांमधील मंत्री,आमदारांमधील नाराजीनाट्य,कुरघोडीच्या राजकारणानं डोकं वर काढलं आहे.यातच सरकारमधील आधीच मंत्री धनंजय मुंडे आणि आता कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांच्यावर कारवाईची टांगती तलवार आहे. अशातच आता महायुती (Mahayuti) सरकारमधील एक धक्कादायक माहिती समोर आल्यानं खळबळ उडाली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात महायुती सरकारमध्ये मंत्रिपदं ,खातेवाटप झाल्यानंतर मंत्र्यांना बंगल्यांचं देखील वाटप करण्यात आलं आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बाबनकुळे यांना रामटेक,पंकजा मुंडे यांना पर्णकुटी,राधाकृष्ण विखे पाटील यांना रॉयल स्टोन,शंभूराज देसाईंना मेघदूत, गणेश नाईकांना पावनगड,हसन मुश्रीफ यांना विशाळगड,उदय सामंतांना मुक्तागिरी तर धनंजय मुंडे यांना सातपुडा यांच्यासह सगळ्यांनाच बंगले देण्यात आले आहेत.

पण मुंबईतील राज्यातील काही कॅबिनेट मंत्र्यां ना बंगल्यांचं वाटप करण्यात आल्यानंतर काही नेतेमंडळींकडून नाराजीचा सूर आळवण्यात आला होता.यातच आता आश्चर्याची बाब म्हणजे,महायुती सरकामधील काही कॅबिनेट मंत्र्यांनी टुमदार शासकीय बंगल्यांबरोबरच आमदार निवासातील रूमही राखून ठेवली आहे.त्यामुळे मंत्री महोदयांची मला मला आणि मलाच म्हणत हाव सुटत नाहीये की,सत्तेचा पुरेपूर उपभोग घेत असल्याची चर्चा आहे.

राज्यात सत्ता कुणाचीही असली तरी आमदार निवासांमधील रूमसाठी प्रचंड खटके उडाल्याचे दिसून आलेलं आहे. या रूमसाठी आमदारांमध्ये मोठी चढाओढ रंगलेली असते.यातून काही आमदारांमध्ये तर खटकेही उडाल्याचेही यापूर्वी अनेकदा पाहायला मिळाले आहे.मुख्यमंत्र्यांकडून कॅबिनेट वा राज्यमंत्री पदांचं वाटप झाल्यानंतर मंत्र्यांनी आकाशवाणी येथील आमदार निवासाची रूम सोडणं आवश्यक असतं.पण तसे होताना दिसून येत नाही.

एकीकडे आमदारांची संख्या जास्त आणि आमदार निवासस्थानामधील रूम कमी अशी परिस्थिती असताना काही मंत्री महोदयांकडून शासकीय बंगल्यासोबतच आमदार निवासातील रूमही ठेवली आहे.त्यामुळे नव्या आमदारांना रूम मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या धक्कादायक प्रकारानंतर काही आमदारांनी याबाबत थेट मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री यांच्याकडेच नाराजी व्यक्त केली आहे.

सध्या मुंबईत मॅजेस्टिक तसेच मनोरा आमदार निवासांमध्ये काम सुरू आहे.त्यामुळे आकाशवाणीसह विस्तारित आमदार निवासच सध्या आमदारांसाठी उपलब्ध आहेत.पण आता मंत्र्यांनी शासकीय बंगल्यासह आमदार निवासातील रूमही स्वत:कडे ठेवल्यामुळे याचे तीव्र पडसाद अधिवेशनाच्या आधीच उमटण्याची शक्यता आहे.

सरकारी टुमदार बंगला आणि आमदार निवासातील रुम ठेवणार्‍यांमध्ये गिरीश महाजन,संजय सावकारे, मकरंद पाटील, बाळासाहेब पाटील, जयकुमार रावल, अतुल सावे, अशोक ऊईके, शंभूराज देसाई, माणिकराव कोकाटे, जयकुमार गोरे, पंकज भोयर,योगेश कदम, इंद्रनील नाईक यांच्यासारख्या भाजप,राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेतील मंत्रिमंडळींचा समावेश आहे.

शिवसेनेचे संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आमदार निवासात रुम न मिळण्यावरुन तक्रार केली आहे. यात त्यांनी माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे भाचे व विधानपरिषदेचे आमदार सत्यजित तांबे यांच्यावर दोन-दोन रूम स्वत:कडे ठेवल्याचं म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT