Mallikarjun Pujari Sarkarnama
मुंबई

Mallikarjun Pujari : ठाण्यात आणखी एक ट्विस्ट; मल्लिकार्जुन पुजारींना OBC बहुजन पार्टीकडून उमेदवारी!

Thane Lok Sabha Constituency : ठाणे जिल्ह्यात आगरी, कोळी आणि कुणबी समाजाची संख्या मोठी आहे. यामुळेच ओबीसींचा जिल्हा अशीही ठाण्याची ओळख आहे.

Pankaj Rodekar

Loksabha Election 2024 : ठाणे लोकसभा मतदारसंघाकडे सर्वांच्या नजरा लागून आहेत. या मतदारसंघातून अद्यापही महायुतीने उमेदवार घोषित केलेला नाही. मात्र इंडिया आघाडी पाठोपाठ आता ओबीसी बहुजन पार्टीने धनगर समाजाच्या मल्लिकार्जुन पुजारी यांना उमेदवारी देत निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे.

ओबीसी जिल्हा अशीही एक ओळख असलेल्या ठाणे जिल्ह्यात तीन मतदारसंघातील ठाणे लोकसभेत यानिमित्ताने जातीच्या कार्डावर राजकारण खेळण्यात येणार असल्याने एक ट्विस्ट निर्माण झाला आहे. यामुळे ठाणे लोकसभेची निवडणूक अधिकच रंगतदार होणार यात काही शंका नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

ठाणे जिल्ह्यात आगरी, कोळी आणि कुणबी समाजाची संख्या मोठी आहे. यामुळेच ओबीसींचा जिल्हा अशी ठाण्याची ओळख आहे. जिल्ह्यात ठाणे, भिवंडी आणि कल्याण असे तीन लोकसभा मतदार संघ येतात. या तिन्ही मतदार संघात आगरी, कोळी आणि कुणबी समाज महत्वाची भूमिका ठरविताना दिसून येतो. यामुळे निवडणूक काळात या तिन्ही समाजाच्या भूमिकेकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते.

आपल्या समाजाच्या उमेदवाराला उमेदवारी मिळावी, यासाठी हे समाज प्रमुख पक्षांकडे आग्रह धरताना दिसून येतात. त्यातच ठाणे, कल्याण आणि भिवंडी या तिन्ही मतदार संघात महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना रंगणार असल्याची चर्चा असून त्यातच आता प्रकाश अण्णा शेंडगे यांच्या ओबीसी बहुजन पार्टीने ठाणे लोकसभेच्या रिंगणात उमदेवार उतरविला आहे. यामुळे ठाणे लोकसभा निवडणुकीत जातीचे कार्ड चालणार का, हे येत्या काळात स्पष्ट होईल.

कोण आहेत मल्लिकार्जुन पुजारी? -

पुजारी हे राष्ट्रीय स्वाभिमानी संघटना तसेच जय मल्हार प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष आहे. 2002 ते 2017 मध्ये त्यांनी महादेव जानकर यांच्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नवी मुंबई अध्यक्ष म्हणून काम पाहिले आहे. तर पुजारी यांचा मुलगा पाल हा गडरिया समाजासाठी काम करणाऱ्या शेफर्ड टायगर फोर्स या संघटनेचे काम पाहत आहे.ठाणे लोकसभा मतदार संघात पाल व गडरिया समाजाची संख्या देखील मोठी आहे. तसेच धनगर समाजाचे 01 लाखापेक्षा जास्त मतदान आहे. याशिवाय 2019 ठाणे लोकसभा निवडणूक त्यांनी वंचित बहुजन आघाडीकडून लढवली होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT