Eknath Khadse, Mandakini Khadse,mangesh chavan
Eknath Khadse, Mandakini Khadse,mangesh chavan sarkarnama
मुंबई

Mandakini Khadse : खडसेंना न्यायालयाचा दणका ; भाजप आमदाराला दिलासा

सरकारनामा ब्युरो

Mandakini Khadse : जळगाव जिल्हा दूध संघाच्या संचालकपदाच्या निवडणूकीत एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी व राज्याचे मंत्री गिरीश महाजन यांच्या नेतृत्वाखाली भाजप-शिंदे गट आघाडी यांच्यात जोरदार चुरस आहे. (Mandakini Khadse latest news)

मंदाकिनी खडसे यांनी भाजपचे आमदार मंगेश चव्हाण (Mangesh Chavan) हे मुक्ताईनगर तालुक्यात सभासद नसतांना त्यांनी उमेदवारी दाखल केली आहे. ती उमेदवारी रद्द करावी यासाठी त्यांनी खंडपीठात याचिका दाखल केली होती, मात्र ती औरंगाबाद खंडपीठाने फेटाळून लावली आहे. त्यामुळे आमदार मंगेश चव्हाण यांना दिलासा मिळाला आहे.

जिल्हा दूध संघाच्या संचालकपद निवडणूकीच्या अर्जांची छाननीही करण्यात आली आहे. यात २० संचालक निवडीसाठी मतदान होणार आहे. छाननीत एकनाथ खडसे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे जगदीश बढे हे रावेर तालुक्यातून बिनविरोध निवडून आल्याने त्यांच्या पॅनलचा श्रीगणेशा झाला आहे.

एकनाथ खडसे यांच्या पत्नी व संघाच्या चेअरमन मंदाकिनी खडसे यांनी मुक्ताईनगर तालुक्यातून उमेदवारी दाखल केली आहे, त्यांच्या विरोधात भाजपचे मंगेश चव्हाण यांनी मुक्ताईनगर तालुक्यातूनच उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. चव्हाण यांच्य अर्जावर मंदाकिनी खडसे यांनी हरकत घेतली घेवून औरंगाबाद खंडपीठात अर्ज दाखल केला होता, यात त्यांनी म्हटले होते कि ज्या तालुक्याचा मतदार आहे, त्याच तालुक्यात त्यांना उमेदवारी दाखल करता येते मात्र आमदार चव्हाण यांनी या नियमाचे उल्लघंन केले आहे, ते चाळीसगाव तालूक्यात सभासद आहेत, मात्र त्यांनी मुक्ताईनगर तालुक्यात उमेदवारी अर्ज दाखल केल आहे. त्यामुळे त्यांची उमेदवारी रद्द करावी अशी मागणी त्यांनी खंडपीठात सादर केलेल्या याचिकेत केली होती.

खंडपीठात या याचिकेवर आज सुनावणी झाली, न्यायधीश संदीप मारणे यांनी मंदाकिनी खडसे यांची याचिका फेटाळून लावली आहे. तर आमदार चव्हाण यांची उमेदवारी मुक्ताईनगरातून ग्राह्य ठरविली आहे. त्यामुळे खडसे यांना मोठा झटका बसला आहे.

उमेदवारी कायम ठेवणार : मंगेश चव्हाण

आमदार चव्हाण म्हणाले, "न्यायदेवतेने आपल्याला न्याय दिला आहे. जिल्हा दूध संघात इतर गटातून सर्व उमेदवारांनी माघार घेतली व त्या ठिकाणी बिनविरोध निवडणूक झाली तरी आपण मात्र मुक्ताईनगरातून माघार घेणार नाही,आपण या मतदार संघातून उमेदवारी कायम ठेवून निवडणूक लढणार आहोत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT