Maratha Aarakshan Andolan: ओबीसीतून मराठा आरक्षण द्या, या मागणीसाठी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा आंदोलनास सुरुवात केली आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर त्यांनी उपोषणास सुरवात केली आहे.
उपोषणाला बसण्यापूर्वी त्यांनी मराठा समजाला शांतता राखण्याचे आवाहन केले आहे. सरकारने गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही, असा निर्धार त्यांनी केला आहे. डोक्यावर गुलाल पडल्याशिवाय आता मुंबई सोडणार नाही, असे मनोज जरांगे म्हणाले.
"मला समाजाचे वाटोळ होऊ द्यायचं नाही, सरकारनं गोळ्या घातल्या तरी आता उठणार नाही. सगळ्यांनी शंततेत घरी जायचं आहे. घाई, गडबड गोंधळ करू नका, पोलिसांना सहकार्य करा, असे ते राज्यातून आलेल्या आंदोलकांना म्हणाले.
आझाद मैदानावर हजारो मराठा बांधवांनी गर्दी केली आहे.'आरक्षण मिळेपर्यंत हलणार नाही' असा इशारा जरांगे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला आहे. समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आलो आहे. मराठ्यांची मान खाली जाईल, असे काही करु नका, मुंबईकरांना त्रास होऊ देऊ नका,असे जरांगे म्हणाले.
सहकार्य केल्याबद्दल जरांगेंनी सरकारने आभार मानले. मुंबईत आझाद मैदानात उपोषण करायचं हे ठरलं होतं. आता उपोषण सुरू आहे. आता तुमची काय जबाबदारी आहे. सरकार आपल्याला सहकार्य करणार नव्हते म्हणून मराठे मुंबईला येणार होते आणि मुंबई जाम करणार होते आणि मुंबई जाम केली पण. आता सरकारने आपल्याला सहकार्य केले आहे परवानगी दिली. त्याबद्दल आपण सरकारचे कौतुकही केले, आता सरकारने आम्हाला बेमुदत उपोषणाला परवानगी द्यावी, अशी मागणी जरांगे यांनी केली आहे.
आझाद मैदानात पोहोचल्या बरोबर मनोज जरांगे यांनी कार्यकर्त्यांना दोन तासांत मुंबई मोकळी करा, असे आवाहन केले आहे. राज्यभरातून आलेलया मराठा आंदोलकांनी दोन तासांत मुंबईतून सर्व गाड्या बाहेर घेऊन जा, आणि मुंबई मोकळी करा, असे थेट आवाहन मनोज जरांगे यांनी आंदोलकांना केले आहे.
दगडफेक, जाळपोळ अशा घटना कोणीही करायच्या नाही,असे आवाहन त्यांनी आंदोलकांना केले आहे. एकही गाडी रस्त्यावर दिसली नाही पाहिजे. सर्वांनी आपल्या गाड्या काढून घ्यायच्या आणि पोलीस सांगतिल तिथे वाहने पार्क करा, असे त्यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.