sachin waze mansukh hiren
sachin waze mansukh hiren sarkarnama
मुंबई

खुनाच्या गुन्ह्यातील वाझेची अजब मागणी ; NIA काय उत्तर देणार

सरकारनामा ब्युरो

मुंबई : उद्योगपती मनसुख हिरेन मृत्यू (mansukh hiren murder case) आणि अँटालिया स्फोटक प्रकरणातील मुख्य आरोपी निलंबित पोलिस अधिकारी सचिन वाझे याने विशेष न्यायालयात नवीन अर्ज दाखल केला आहे. या अर्जाची दखल घेत न्यायालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) त्यावर उत्तर देण्यास सांगितलं आहे. एनआयए सोमवारी (ता.२७) याबाबत आपली बाजू मांडणार आहे.

सचिन वाझेच्या वकिलांनी याबाबतचा अर्ज मुंबई सत्र न्यायालयात दाखल केला आहे. त्यांची दखल घेण्याची सूचना न्यायालयाने एनआयएला दिल्या आहेत. या अर्जात सचिन वाझेने (sachin waze) ह्रदयावरील शस्त्रक्रियेच्या उपचारासाठी घरीच नजरकैदेत ठेवा,'' अशी विनंती केली आहे. या अर्जाची दखल न्यायालयाने घेतली आहे.

अँटालिया स्फोटक आणि मनसुख हिरेन मृत्यूप्रकरणी सचिन वाझेसह नऊ आरोपींना एनआयएकडून अटक करण्यात आली. त्यांना तळोजा कारागृहातील न्यायालयीन कोठडीत ठेवण्यात आले होते. मात्र, तुरुंगात असताना ह्रदयविकाराचा त्रास होऊ लागल्याने वाझेला ता. ३० ऑगस्ट रोजी भिवंडी येथील खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले होते. रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्याच्यावर ओपन हार्ट शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्याचे डॉक्टरांनी सांगितले, यानंतर मुंबई सेंट्र्ल येथील वोकहार्ट रुग्णालयात वाझेवर ता. १४ सप्टेंबरला ही शस्त्रक्रिया करण्यात आली.

सचिन वाझेनं लिहिलेल्या पत्रात तीन मंत्री आणि एका बड्या नेत्यावर आरोप केले होते. सीबीआयनं एप्रिलमध्ये त्याच्या चौकशीचा एक भाग म्हणून वाझेची चौकशी केली होती. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणी सचिन वाझे तळोजा कारागृहात होता. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबत त्याने जबाब दिला आहे. यासाठी सीबीआयने एनआयएच्या (राष्ट्रीय तपास यंत्रणा) विशेष न्यायालयात अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने सीबीआयला वाझेची चैाकशी करण्यासाठी परवानगी दिली आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून अनिल देशमुख यांच्यावर आरोप केला आहे. देशमुख यांनी सचिन वाझेला मुंबईमधून दर महिन्याला शंभर कोटीं रुपये वसूल करण्याचे टार्गट दिले होते, असा आरोप परमबीर सिंह यांनी केला आहे. देशमुख यांनी या आरोपांचे खंडन केले आहे

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT