mumbai news Sarkarnama
मुंबई

Maratha Andolan : 'एक मराठा, लाख मराठा' घोषणा देत मुंबईत आमदार निवासाबाहेर वाहनांची तोडफोड; दोघे पोलिसांच्या ताब्यात

Maratha Reservation Protest At Amdar Niwas Mumbai : मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं आहे. त्यानंतरही आंदोलनाला हिंसक वळण लागलं आहे. हे लोण मुंबईतही पोहोचलं आहे.

Sachin Fulpagare

Maratha Reservation Latest News : मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मराठा समाज आक्रमक झाला आहे. अनेक ठिकाणी जाळपोळ आणि वाहनांची तोडफोड होत आहे. आता मुंबईतील अत्यंत सुरक्षित आणि व्हीआयपी भागात असलेल्या आकाशवाणी शासकीय आमदार निवासात वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. अज्ञातांकडून ही तोडफोड करण्यात आली आहे. या वेळी 'एक मराठा, लाख मराठा' अशा घोषणा देण्यात आल्या. आता आमदार निवासाच्या ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

मुंबईत मंत्रालयाच्या शेजारीच असलेल्या आकाशवाणी आमदार निवास परिसरात काही शासकीय वाहनांची तोडफोड करण्यात आली आहे. आकाशवाणी आमदार निवासाबाहेर उभ्या असलेल्या वाहनांनी २ अज्ञातांकडून तोडफोड करण्यात आली आहे. मुंबईत अशा पद्धतीने हल्ला झाल्याने ही गंभीर बाब मानली जात आहे.

आकाशवाणी आमदार निवासाबाहेर आमदारांची वाहनं पार्क करण्यात आली होती. यासोबतच काही शासकीय वाहनंही तिथे होती. वाहनांची तोडफोड करणाऱ्या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येत आहे. आणि पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे. नेमकी कोणाची वाहनं फोडण्यात आली आहेत, याची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही.

बीडमध्ये आमदारांच्या घरांवर दगडफेक करत जाळपोळ करण्यात आली होती. यासोबतच शासकीय वाहनांचीही तोडफोड करण्यात आली होती. आता मराठा आंदोलनाचं लोण मुंबईतही पोहोचल्याचं सांगण्यात येत आहे. मंत्रालयाजवळ असलेल्या आकाशवाणी आमदार निवासाबाहेर आमदारांची वाहनं उभी होती. त्या वाहनांवर हल्ला झाला आहे. या प्रकरणी मरिन ड्राइव्ह पोलिसांनी वाहनांची तोडफोड करणाऱ्यांना ताब्यात घेतल्याचं सांगण्यात येत आहे. आता या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया केली जाईल. आणि पुढील कायदेशीर कारवाई होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT