Maratha Reservation : मराठा आरक्षणाच्या विरोधात याचिका करणाऱ्या अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर मुंबई हायकोर्टाने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मराठा आरक्षणाच्या विरोधी याचिकांवर सुनावणी सुरु असताना अॅड. गुणरत्न सदावर्ते हे गैरहजर राहिले आहेत.
'मूळ याचिकाकर्त्यांना प्रकरणाचं गांभीर्य नाही का? आपली याचिका सर्वात आधी घ्या म्हणून सदावर्ते आमच्यापुढे विनंती करत होते. आता युक्तिवाद करण्याची वेळ आली तर तेच गायब झाले?' असा प्रश्न हायकोर्टाने विचारत सदावर्तेंना झापले.
मराठा आरक्षणाची इतकी महत्त्वपूर्ण सुनावणी सुरू असताना सदावर्ते 'बिग बॉस'मध्ये जाऊन बसलेत, अशी इतर वकिलांकडून हायकोर्टाला माहिती देण्यात आली.
गुणरत्न सदावर्ते यांचा मराठा आरक्षणाला विरोध असून त्यांनी यापूर्वी देखील देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना त्यांनी दिलेल्या आरक्षणाच्या विरोधात न्यायालयात गेले होते. मराठा समाजाला आरक्षण देणे म्हणजे संविधानाला हरताळ फासने असल्याचे सदावर्ते म्हणाले होते.
मराठा आरक्षणाला विरोध करणाऱ्या सर्व याचिकाकर्त्यांचा युक्तिवाद संपला आता कुणालाही युक्तिवाद करण्याची संधी मिळणार नाही, असे म्हणत हायकोर्टाने सांगितले. हायकोर्टाने मराठा आरक्षणासंदर्भातील सुनावणी 19 नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली आहे. दरम्यान पुढील सुनावणीत राज्य सरकारतर्फे महाधिवक्ता डॉ. बीरेंद्र सराफ युक्तिवाद करणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.