Eknath Shinde - Devendra Fadnavis - Ajit Pawar Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar on Shinde - Fadnavis Delhi Tour : शिंदे-फडणवीसांची एकत्र दिल्लीवारी; पण अजितदादांना थांगपत्ताच नाही !

Maratha Reservation News : मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस हे तातडीने बुधवारी दुपारी दिल्लीला रवाना झाले आहेत. मात्र...

Deepak Kulkarni

Mumbai News : आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षणासाठी सरकारला दिलेली ४० दिवसांची मुदत मंगळवारी संपली. यानंतर मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा जरांगे पाटलांनी बेमुदत उपोषणाचं हत्यार उपसलं आहे, पण याचवेळी मराठा आरक्षणासंबंधीच्या हालचालींना वेग आला आहे. लवकरच मराठा आरक्षणाविषयी मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे.

तसेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे तातडीने बुधवारी दुपारी दिल्लीला रवाना झाले आहेत. मात्र, या दौऱ्यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार नसल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. पण आता शिंदे - फडणवीसांच्या दिल्ली दौऱ्यावर अजित पवारांनी मोठं विधान केले आहे. यामुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी मुंबईत माध्यमांशी संवाद साधला. त्यांना मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीसाठी गेले आहेत, असा सवाल अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारण्यात आला. त्यावेळी त्यांनी मला विचारून गेले का...? असं उत्तर दिले. तसेच सकाळपासून मंत्रालयात आहे. या संदर्भात मला काही माहीत नाही, मी माहिती घेऊन सांगतो, असेही अजित पवार म्हणाले.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे दिल्लीकडे रवाना झाले आहेत. त्यांच्या दिल्ली दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागलेले आहे. दिल्लीत शिंदे - फडणवीसांची केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत तातडीची बैठक होत आहे. या बैठकीत जरांगे पाटलांच्या उपोषणासह मराठा आरक्षणावर ठोस पाऊल घेण्यासंबंधी चर्चा होण्याची शक्यता आहे.

मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणा(Maratha Reservation) साठी बेमुदत आंदोलनाचं हत्यार उपसलं आहे. त्यांची मराठ्यांना सरसकट कुणबी प्रमाणपत्र द्यावे, ही आग्रही मागणी आहे. जरांगे पाटलांच्या आजपासून सुरू केलेल्या आताच्या उपोषणात अन्न-पाणी घेणार नाही. सलाइन लावणार नाही, कोणतेही उपचार घेणार नाही, समाजाला न्याय मिळेपर्यंत माझा लढा सुरू राहील, असे जरांगे पाटील म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT