Sadavarte, Pawar,Thackeray News : मराठा आरक्षण आंदोलनाविरोधात गुणरत्न सदावर्तेंनी याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर ८ नोव्हेंबर रोजी उच्च न्यायालय सुनावणी घेणार आहे. राज्यात जातीय तेढ निर्माण करण्यात आल्याचा याचिकेतून सदावर्तेंनी आरोप केला आहे. शरद पवार आणि उद्धव ठाकरे जरांगेंच्या आंदोलनामागे असल्याचाही सदावर्तेंनी आरोप केला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गुणरत्न सदावर्ते म्हणाले, ''याचिकेसंदर्भात सांगायचं झालं तर मी प्रभू श्रीरामचंद्राच्या विचाराचा माणूस आहे. सुराज्य या देशात राहावं या विचारांचा मी माणूस आहे. अखंड भारत राहावा आणि अखंड भारतासारखेच संपूर्ण हिंदुस्थानींचे विचार राहावेत, यासाठी ही याचिका आहे.''
याचबरोबर एसटी आंदोलनाबाबत बोलताना सदावर्तेंनी सांगितलं की, ''कष्टकऱ्यांचा विषय आहे. त्यावेळी ३३ हजार मराठे होते, आजही माझ्यासोबत ३३ हजार मराठा आहेत. आमच्या संघटनेत ६८ हजार लोक आहेत, त्यापैकी ३३ हजार मराठे आमच्या सोबत आहे.
तसेच, ''जात म्हणून कुणालीही विरोध नाही. परंतु लक्षात घ्या एसटी आंदोलनाच्यावेळी १२४ कष्टकऱ्यांचे मृत्यू झाले होते. कष्टकऱ्यांचं पोट भरलं जावं यासाठी ती मागणी होती. माझ्या १२४ कष्टकऱ्यांनी त्यात मराठासुद्धा होते, त्यांनी सातवा वेतन आयोग आणि विलीनीकरणासाठी बलिदान दिलं होतं. आजही सातव्या वेतन आय़ोगाची वाट पाहत आहोत, की सरकार देईल,'' असंही सदावर्तेंनी बोलून दाखवलं.
याशिवाय ''त्यावेळी उद्धव ठाकरेंना तिथे यायला वेळ मिळाला नाही. उद्धव कुठे होते, हरवल्यासारखे होते. ते सापडलेच नव्हते. कष्टकऱ्यांना भेटलेच नव्हते. ज्याप्रकारे राजकीय तोडफोड केली जाते, त्याप्रकारे माझ्या कष्टकऱ्यांना तोडण्याच्या भानगडीत शरद पवार होते.,' असा आरोप सदावर्तेंनी केला.
तसेच ''त्यावेळी कोणी लालपरीवर दगड टाकला नाही, लालपरी पेटवली नाही. परंतु आज जी परिस्थिती आहे, हिंसक आंदोलन आहे. देशात महाराष्ट्राची जी चांगली प्रतिमा आहे, ती खराब करण्याची भूमिका आहे,'' अशा शब्दांत सदावर्ते यांनी आपली भूमिका मांडली आहे.
तर ''मी जरांगे पाटलांना सांगू इच्छितो की, त्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करावं त्यांना कोणाचाही नकार असू शकत नाही. मागास आयोगाच्या एकाही रिपोर्टमध्ये मराठा टिकत नाही. कारण, सर्वोच्च न्यायालयानेसुद्धा शेवटचा निकाल नाही असा सांगितला आहे, तर अशा परिस्थितीत तुम्ही मराठा आरक्षण किंवा कुणबी आरक्षण देणं कितपत योग्य आहे? असंवैधानिक गोष्टीचे तुम्ही समर्थन करू शकता का?'' असंही या वेळी सदावर्ते यांनी सांगितलं.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.