Marathi Vijay Melava_Uddhav Thackeray_Raj Thackeray Sarkarnama
मुंबई

Marathi Vijay Melava live updates: ठाकरे बंधूंच्या मेळाव्यापूर्वी मनसैनिक ताब्यात; दादर पोलिसांची कारवाई

Uddhav Thackeray and Raj Thackeray joint Vijay Melava at Worli Dome:मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, आणि काँग्रेसनेही पाठिंबा दिल्याचं बॅनर्सवरून दिसत आहे.

Mangesh Mahale

हिंदी भाषेच्या सक्तीला विरोध करीत शिवसेना आणि मनसेनं महायुती सरकारला चांगलेचं घेरलं होते. त्यानंतर त्रिभाषा धोरणाबाबतचा आदेश सरकारनं रद्द केला. आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा विजयी मेळावा साजरा होत असताना पालघरमधील मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. पालघर येथील मनसैनिक तुलसी जोशी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना दादर परिसरात ताब्यात घेतले असल्याची माहिती आहे.

मुंबईतील वरळी डोम येथे शिवसेना उद्धव ठाकरे पक्ष आणि मनसेचा भव्य एकत्रित मेळावा होणार आहे. विजयी मेळाव्याच्या निमित्तानं उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर दोन दशकानंतर एकत्र येणार आहेत. आज सकाळी 11.30 वाजता राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे डोमला पोहोचतील. कुणीही आपल्या पक्षाचा झेंडा किंवा चिन्ह घेऊन येऊ नये, असे दोन्ही पक्षाकडून आवाहन करण्यात आले आहे.

मेळाव्यासाठी राज्यातून कार्यकर्ते मुंबईच्या दिशेनं रवाना झाले आहेत. मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार, आणि काँग्रेसनेही पाठिंबा दिल्याचं बॅनर्सवरून दिसत आहे. ‘मराठीचा भव्य विजय मेळावा, आवाज महाराष्ट्राचा, आवाज मराठी माणसाचा, आवाज ठाकरेंचा,’ असा बॅनरवर मजकूर आहे. मुलुंड टोलनाक्यावर असे बॅनर्स लावण्यात आले आहेत.

हा विजयी मेळावा असला तरी त्यात कोणतंही पक्षीय लेबल लावायचं नाही, हा मराठी माणसाचा विजय आहे, त्यामुळे मेळावा मराठी माणसाचा आहे, असे राज ठाकरे, उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. या मेळाव्याला कोणताही झेंडा नको, फक्त मराठीचा अजेंडा असू द्या, असा आदेश राज ठाकरेंनी दिला आहे.

मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी परिधान केलेल्या टी-शर्ट ने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतलं. 'आवाज मराठीचा' असा मजकूर लिहिलेला टी-शर्ट त्यांनी परिधान केला होता. टी-शर्टवर बाराखडी लिहिलेली आहे. "महाराष्ट्रात राहायचं असेल तर मराठी शिकावीच लागेल, अन्यथा त्यांचे बारा वाजवल्याशिवाय राहणार नाही," असा इशारा देशपांडेंनी दिला आहे.

वरळी मध्ये "आवाज मराठीचा" फलक झळकले आहेत. आवाज मराठीचा कोणताही झेंडा नाही फक्त मराठीचाच अजेंडा. असा उल्लेख बॅनरवर आहे. तर आवाज मराठीचा, लाभले आम्हास भाग्य बोलतो, मराठी झालो खरेच धन्य ऐकतो मराठी..असे बॅनर लागले आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT