Marathi Nonmarathi conflict Sarkarnama
मुंबई

Marathi Nonmarathi conflict : पुन्हा एकदा मराठीविरुद्ध अमराठी; सत्यनारायण पूजा अन् हळदी कुंकू कार्यक्रमाला अमराठींच्या विरोधावरून वाद

Marathi Nonmarathi controversy Nandivali Panchanand Mumbai Kalyan Dombivli Manpada Police Station : मुंबईच्या कल्याण-डोंबिवलीत पुन्हा एकदा मराठी-अमराठी वाद उफाळला असून, मानपाडा पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Pradeep Pendhare

Mumbai News : मुंबईच्या कल्याण-डोंबिवलीत पुन्हा एकदा मराठी-अमराठी वाद उफाळला आहे. डोंबिवलीतील नांदिवली पंचानंद येथील एका सोसायटीमध्ये सत्यनारायणाची पूजा व हळदी कुंकू समारंभाचे आयोजन करण्यात आले होते.

या कार्यक्रमाच्या निमित्ताने सोसायटीच्या व्हॉट्स अप ग्रुपवर चर्चा सुरू असताना सोसायटीमधील अमराठी भाषिकांनी कार्यक्रमाला विरोध केला. तसेच महिलांसोबत अर्वाच्य भाषेत बोलणी केली. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात महिलेच्या तक्रारीवरून सोसायटीमधील अनिल देविदास भट (वय 52) व चिराग शरद लालन (वय 38) या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण डोंबिवली पुन्हा एकदा मराठीविरुद्ध अमराठी, वादाचा व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे. मुंबई (Mumbai), ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, पनवेलमध्ये मराठीविरुद्ध परप्रांतीय, असे वाद अनेकदा घडल्याचे पाहायला मिळाले. डोंबिवली पुन्हा एकदा मराठीविरुद्ध अमराठी वाद उफाळला. यामुळे मराठीविरुद्ध अमराठी हा संघर्षाचा मुद्दा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील गाजणार असे दिसते आहे.

डोंबिवली पूर्वेकडील नांदिवली परिसरात साई कमल छाया या इमारतीमध्ये 2 फेब्रुवारीला सत्यनारायण पूजा व हळदीकुंकू समारंभ आहे. या कार्यक्रमाबाबतची माहिती सोसायटीच्या बोर्डवर लिहिण्यात आली होती. सोसायटीतील काही अमराठी सदस्यांनी या बोर्डचा फोटो काढून सोसायटीचा समाज माध्यमांवर (Social media) असलेल्या ग्रुपवर टाकून अपशब्द वापरले. त्यामुळे या सोसायटीमध्ये मराठीविरुद्ध अमराठी, असा वाद उफाळला.

समाज माध्यमांवर चर्चा सुरू असतानाच, अमराठी भाषकांनी हा कार्यक्रम सोसायटीमध्ये होऊ द्यायचा नाही, अशी भूमिका घेतली. महिलांनी हा कार्यक्रम स्वखर्चाने आयोजित केला असून सोसायटीचा पैसा यात नाही. त्यामुळे हा कार्यक्रम घ्यायचाच, अशी भूमिका सोसायटीमधील महिलांनी घेतली. त्यासाठी सोसायटीच्या आवारात महिला जमल्या. तेव्हा मराठी भाषिक व्यक्तीने महिलांना शिवीगाळ करत हा कार्यक्रम करण्यास विरोध केला. अखेर महिलांनी मानपाडा पोलिस ठाणे गाठत दोघांविरोधात तक्रार दाखल केली आहे. काल रात्री सोसायटीमध्ये यावर मोठा वाद झाला. या गोंधळाचा व्हिडिओ देखील समाज माध्यमांवर व्हायरल झाला आहे.

मराठी कुटुंबाने आरोप केलाय की, 'अमराठी कुटुंबियांनी या कार्यक्रमाला विरोध केला. आम्हाला शिवीगाळ केली, अपशब्द वापरले'. याप्रकरणी मराठी कुटुंबियांने मानपाडा पोलिस ठाण्यात धाव घेत तक्रार केलीय. अमराठी कुटुंबियांचा हा प्रकार आम्ही खपवून घेणार नाही, असा इशारा सोसायटीतील मराठी कुटुंबियांनी दिला आहे. वरिष्ठ पोलिस निरिक्षक विजय कादबाने या प्रकाराचा तपास करत आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT