BMC mayor Race Sarkarnama
मुंबई

Mayor Election : महापौर-उपमहापौर निवडीचा कार्यक्रम जाहीर; तुमच्या महापालिकेत कधी निवडणूक?

mayor selection process : राज्यात २९ पैकी जवळपास २५ महापालिकांमध्ये महायुतीचीच सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही अपवाद वगळता बहुतेक ठिकाणी भाजपला बहुमत मिळाले आहे.

Rajanand More

Mayor poll update : राज्यातील २९ महानगरपालिकांच्या महापौर पदासाठी गुरूवारी आरक्षण सोडत काढण्यात आली. सर्वाधिक उत्सुकता असलेल्या मुंबई महापालिकेचे महापौरपद सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी राखीव झाले आहे. तर पुणे, नागपूर, नाशिक या महानगरांमध्येही महिलांना संधी मिळणार आहे. आरक्षण सोडत जाहीर झाल्यानंतर आता महापौर व उपमहापौर निवडीचा कार्यक्रमही निश्चित करण्यात आला आहे.

मुंबई महापालिकेच्या महापौर व उपमहापौर पदांसाठीची निवडणूक ३० किंवा ३१ जानेवारीला होईल. याबाबतचा निर्णय महापालिकेचे नगरसचिव घेतील. उर्वरित सर्व २८ महापालिकांसाठी याच दिवशी महापौर व उपमहापौर निवडले जाणार आहे. या महापालिकांची तारीख व वेळ संबंधित विभागीय आयुक्त निश्चित करणार आहेत.

सर्व २९ महापालिकांसाठी महापौर आणि उपमहापौर पदांसाठी इच्छूक सदस्य महापालिका सचिवांकडे २७ ते २८ जानेवारीदरम्यान आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. त्यानंतर ३० किंवा ३१ जानेवारी रोजी दोन्ही पदांसाठी निवडणूक होईल. महापालिकांच्या नवनिर्वाचित सदस्यांच्या पहिल्या बैठकीदरम्यान ही निवड प्रक्रिया पार पडेल.

दरम्यान, राज्यात २९ पैकी जवळपास २५ महापालिकांमध्ये महायुतीचीच सत्ता येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. काही अपवाद वगळता बहुतेक ठिकाणी भाजपला बहुमत मिळाले आहे. त्यामुळे या महापालिकांमध्ये भाजपचे महापौर बसतील, हे निश्चित आहे. विरोधकांकडून तिथे उमेदवार देण्यात आले तरी भाजपचे उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात. मात्र, ताकद कमी असल्याने विरोधकांकडून उमेदवार न देण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे भाजपचे महापौर व उपमहापौर पदाचे उमेदवार बिनविरोध होऊ शकतो.

काही महापालिकांमध्ये शिवसेनेचे महापौर असतील. तर काही महापालिकांमध्ये महायुतीत महापौर व उपमहापौर या पदांमध्ये वाटाघाटी होऊ शकतात. चंद्रपूर, अमरावती, कल्याण-डोंबिवली या महापालिकांमध्ये सत्ता आणि महापौर पदासाठी जोरदार रस्सीखेच सुरू आहे. त्यामुळे तिथे नेमके काय चित्र असणार, याबाबतची उत्सुकता वाढली आहे.

मुंबई महापालिकेसह पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, नवी मुंबई या प्रमुख शहरांमध्ये भाजपचा महापौर असेल. मुंबईमध्ये शिवसेनेकडूनही अडीच वर्षांसाठी महापौरपद मागितले जाऊ शकते. किंवा शिवसेनेला महापौरपद मिळेल, अशी शक्यता आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT