मुंबई : शिवसेनेचे (Shiv Sena) खासदार संजय राऊत यांनी भाजप (Bjp) नेते किरीट सोमय्या आणि त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. त्याविरोधात सोमवारी सोमय्या कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली आहे. कोणताही पुरावा नसताना राऊतांकडून बदनामीकारक वक्तव्य केली जात असल्याने त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे राऊतांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. (Kirit somaiya Latest Marathi News)
मेधा सोमय्या यांनी याबाबतचा तक्रार अर्ज मुंलुंडमधील नवघर पोलीस ठाण्यात दिला आहे. त्यांच्यासोबत त्यांचा मुलगाही होता. राऊतांवर त्यांनी धमकावण्याचे आरोप केले आहेत. त्यांच्याविरोधात आयपीसी कलम 503, 506 आणि 509 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी अर्जात करण्यात आली आहे. राऊत यांनी माध्यमांमध्ये दुर्भाग्यपूर्ण आणि अयोग्य भाष्य केलं आहे. त्यांनी केवळ आपलं चारित्र्यहनन केलं नाही तर मला घाबरवलं आणि धमकावलंही आहे, असं तक्रार अर्ज म्हटलं आहे. (Medha Somaiya filed Complaint against Sanjay Raut)
याआधी मेधा सोमय्या यांनी राऊतांना मानहानीची नोटीस पाठवली होती. राऊतांनी 48 तासांत माफी मागितली नाही, तर कायदेशीर कारवाई करू, असं नोटीसीमध्ये म्हटलं होतं. त्यानंतर आता पोलीसांत तक्रार देण्यात आली आहे. सोमय्या यांच्या पत्नी डॉ. मेधा सोमय्या यांनी १०० कोटींचा शौचालय घोटाळा केला असल्याचा आरोप राऊत यांनी केला होता.
माझ्याविरोधात कितीही खोट्या तक्रारी करा, आगामी काळात विक्रांत घोटाळा आणि टॉयलेट घोटाळ्यापेक्षा मोटे घोटाळे बाहेर आणणार आहे. युवा प्रतिष्ठानच्या नावे झालेल्या घोटाळ्यात कोट्यवधी रुपये प्रतिष्ठानच्या खात्यात जमा झाले आहेत. या घोटाळ्याची चौकशी व्हायला हवी, असंही राऊतांनी म्हटलं होतं.
दरम्यान, संजय राऊत यांनी सोमय्या कुटुंबावर अनेक आरोप केले आहेत. त्याचे पुरावे त्यांनी द्यावे, अन्यथा माफी मागणी, असे मेधा सोमय्या यांनी पाठवलेल्या नोटीसीमध्ये म्हटले होते. त्याच बरोबर राऊत यांनी केलेला 100 कोटी रुपयांच्या शौचालय घोटाळ्याचा आरोप बदनामीकारक असून ते पूर्णपणे खोटे आहेत, असा दावाही त्यांनी केला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.