Ravi Rana| Bacchu Kadu| 
मुंबई

'वर्षा' वर अडीच तास खलबते ; वाद मिटणार की चिघळणार ? ; बच्चू कडू-रवी राणा 'सागर' बंगल्यावर..

Eknath Shinde : वरिष्ठ पातळीवर हा वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू..

सरकारनामा ब्युरो

Eknath Shinde : गेल्या काही दिवसापासून आमदार बच्चू कडू आणि आमदार रवी राणा यांच्यात वाद पेटला आहे. वाद मिटवण्यासाठी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रविवारी मध्यरात्री मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला आहे. पण हा वाद मिटणार की चिघळणार हे लवकरच समजेल. आज दोन्ही नेते पत्रकार परिषद देऊन याबाबत स्पष्टीकरण देणार आहेत.

एकमेंकावर आरोप न करण्याच्या सूचना कडू आणि राणा यांना शनिवारी मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. त्यानंतर दोन नेते शांत आहेत. आजच्या पत्रकार परिषदेत ते काय भूमिका घेतात, याकडे सगळ्याचे लक्ष आहे. रविवारी रात्री झालेल्या बैठकीत काय निर्णय झाला, याबाबत बैठकीला उपस्थित नेत्यांनी बोलण्यास नकार दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमदार रवी राणा यांना रविवारी मुंबईत आपल्या ‘वर्षा’ निवासस्थानी बोलावले होते. त्यानुसार, रात्री 10 वाजताच्या सुमारास बच्चू कडू मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर बच्चू कडू, रवी राणा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह इतर नेत्यांच्या उपस्थितीत जवळपास अडीच तास बैठक झाल्याचे बोलले जात आहे.

रवी राणा आणि बच्चू कडू हे दोन्ही नेते आज (सोमवारी) ‘सागर’ बंगल्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार आहेत. त्यानंतर वाद मिटल्याच्या संदर्भात पत्रकार परिषद घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

रवी राणा यांनी बच्चू कडूंवर आरोप केले आहेत. बच्चू कडू यांनी राणांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना थेट राज्य सरकारलाच इशारा दिला आहे. रवी राणा यांनी माझ्यावर केलेल्या आरोपाचे पुरावे सादर करावेत अन्यथा एक तारखेला वेगळा निर्णय घेऊ असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. तसेच आपल्याला सात ते आठ आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावाही कडू यांनी केला आहे.

आता वरिष्ठ पातळीवर हा वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.दरम्यान, 'हम साथ साथ हे'अशा एका वाक्यात राणा यांनी सांगितले आहे.या दोन्ही नेत्यांमध्ये समेट झाला की नाही, हे दुपारी समजेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT