Mahavikas Aghadi | Mahayuti Politics  Sarkarnama
मुंबई

Maharashtra Politics : शिंदे-फडणवीस-पवार आणि ठाकरे-पवारांच्या बैठकांची खडाखडी; पाडापाडीची रणनीती ठरणार

Maharashtra Politics : ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात विरोधी पक्षांच्या "इंडिया"ची बैठकही मुंबईत होणार आहे

सरकारनामा ब्यूरो

Mumbai Politics: राज्य विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशन सुरू असतानाच आज मुंबईत तीन महत्त्वाच्या बैठका होणार असून आगमी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती आखण्यासाठी या बैठका होत असल्याचे सांगितले जात आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या या बैठकांमध्ये महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची रणनीती या बैठकांमधून ठरणार असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा एकदा राजकीय वातावरण तापण्याची चिन्हे आहेत.

चर्चगेट परिसरातील एमसीए गरवारे लॉन्जमध्ये महाविकास आघाडीची आज बैठक होणार असून महाविकास आघाडीचे सर्व आमदार उपस्थित राहणार आहेत. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील या बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करणार आहेत.गेल्या दिड वर्षांपासून राज्यातील महापालिकांच्या निवडणुका खोळंबल्याने या महापालिका निवडणुका, आगामी विधानसभा निवडणुकांच्या दृष्टीने ही बैठक होणार आहे.

तसेच ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या किंवा सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात विरोधी पक्षांच्या "इंडिया"ची बैठकही मुंबईत होणार आहे. या बैठकीबाबतही चर्चा होणार असल्याचे सांगितलं जात आहे.

दुसरीकडे,शिंदे-फडणवीस- पवार यांच्या महायुतीचीही आज सायंकाळी सात वाजता मुंबईतील ताज हॉटेलमध्ये बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार हे उपस्थित राहणार आहेत. बैठकीत विधानसभा, महापालिका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्यानिवडणुका मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भातही चर्चा होण्याची शक्यता आहे.

Edited By- Anuradha Dhawade

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT