Minister Eknath Shinde became emotional with the memory of Balasaheb Bhilare Dada-ub73 
मुंबई

भिलारे दादांच्या आठवणीने मंत्री एकनाथ शिंदे झाले भावूक

पक्ष कुठलाही असो पण दादा नेहमी आमच्यावर प्रेम करीत राहिले. आमचा आमच्या मातीतील एक मार्गदर्शक हरपला आसून तालुक्याची खूप मोठी भरून न येणारी हानी झाली.

रविकांत बेलोशे

भिलार : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुक्याचे ज्येष्ठ नेते दिवंगत बाळासाहेब भिलारे यांच्या आठवणीने नगरविकासमंत्री तथा महाबळेश्वर तालुक्याचे भूमिपुत्र एकनाथ शिंदे यांचे डोळे पाणावले आणि भावूक झाले. काल उशिरा मंत्री शिंदे यांनी भिलार येथे कै. बाळासाहेब भिलारे यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी आले होते. Minister Eknath Shinde became emotional with the memory of Balasaheb Bhilare Dada

यावेळी त्यांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला आम्ही कोयना काठची जनता एका विकास पुरुषाला मुकलो असून दादांनी आमच्या जलाशयापलीकडील गावांना बोट, तराफा तसेच रस्ते या दळणवळणाच्या सोयी पुरवल्याने आज आम्ही आमच्या गावाला लगेच पोहोचू शकतो, असे सांगितले.

पक्ष कुठलाही असो पण दादा नेहमी आमच्यावर प्रेम करीत राहिले. आमचा आमच्या मातीतील एक मार्गदर्शक हरपला आसून तालुक्याची खूप मोठी भरून न येणारी हानी झाली असल्याचे सांगताना त्यांचे डोळे पाणावले. यावेळी मंत्री शिंदे यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना उजाळा दिला. 

यावेळी बाळासाहेब भिलारे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहिली. यावेळी  नितीन भिलारे,जतिन भिलारे, अमित भिलारे, अनिल भिलारे, सुधीर भिलारे, प्रवीण भिलारे , शशिकांत भिलारे, अमोल भिलारे, राजेंद्र भिलारे, आनंदा भिलारे, बाजीराव भिलारे आदी उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT