eknath shinde , Milind Narvekar sarkarnama
मुंबई

मिलिंद नार्वेकरही शिंदे गटात जाणार? शिंदे गटातील मंत्र्यांच्या दाव्याने खळबळ

दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी मिलिंद नार्वेकर (Milind Narvekar) यांची घरी जाऊन भेट घेतली होती.

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत (ShivSena) बंड केल्यामुळे पक्षात अभुतपूर्व फुट पडली आहे. ४० आमदारांसह १२ खासदार शिंदे गटात गेले आहेत. त्याच बरोबर १२ खासदार आणि पक्षातील अनेक पदाधिकारीही शिंदे गटात गेले आहे. मात्र, आता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या विधानाने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

धुळ्यातील सभेत बोलाना गुलाबराव पाटील म्हणाले, बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक चम्पासिंग थापा यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंचे (Uddhav Thackeray) स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकरदेखील (Milind Narvekar) शिंद गटात सहभागी होतील, असा दावा त्यांनी यांनी केला. त्यांच्या या विधानामुळे सर्वांच्याच भूवया उंचावल्या आहेत.

चम्पासिंग थापाने काय केले? ज्या थापाने त्याचे संपूर्ण आयुष्य बाळासाहेबांच्या चरणी अर्पण केले होते. तोदेखील यांना सोडून शिंदे गटात आला आहे. यांनी आता टीका करायची तरी कशी. थापा गेला, आता मिलिंद नार्वेकर येत आहेत, असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला.

शिंदे यांच्या बंडानंतर नार्वेकर यांच्यासोबत मात्र त्यांचा संवाद कायम आहे. शिंदे गणेशोत्सवात नार्वेकर यांच्या घरी दर्शनासाठी पोहोचले होते. तसेच शिंदे सूरतमध्ये असताना उद्धव ठाकरेंनी चर्चेसाठी ज्यांना पाठवले होते, त्यामध्ये नार्वेकर यांचा समावेश होता. नार्वेकर हे ठाकरे यांचे विश्वासू सहकारी आहेत, अशी बातमी एक वृत्तपत्राने दिली आहे.

दरम्यान, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सेवेकरी म्हणून चम्पासिंग थापा यांना ओळखले जात होते. त्यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा दिला. एकेकाळी मातोश्रीमधील एक सदस्य म्हणून थापा यांची ओळख होती. त्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT