Minister Nitin Gadkari keeps his word true says MP Udayanraje 
मुंबई

मंत्री नितीन गडकरी दिलेला शब्द खरा करतात : उदयनराजे

ग्रेड सेपरेटरकरीता श्री. गडकरी आणि तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोलाचे सहकार्य केल्यामुळेच सातारा सारख्या विकसनशील शहरात ग्रेडसेपरेटर सारखे देखणे आणि दूरगामी चांगला परिणाम करणा-या विकास कामाचे लोकार्पण करण्यात आले आहे.

सरकारनामा ब्यूरो

सातारा : सातारा जिल्ह्यातील रस्त्यांना सेंटर रोड फंड योजनेतून निधी द्यावा, या मागणीसाठी खासदार उदयनराजे भोसले यांनी आज केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. श्री. गडकरी दिलेला शब्द खरा करण्याचा नेहमीच प्रयत्न करतात. त्यामुळे केंद्राच्या योजनेतून सातारा जिल्ह्यातील रस्त्यांच्या कामांना भरीव निधी मिळेल, असा विश्वास उदयनराजेंनी व्यक्त केला आहे. 

खासदार उदयनराजे भोसले यांनी आज दिल्लीत केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन सातारा जिल्ह्यातील रस्ते प्रकल्प व विविध विकासकामांसंदर्भात चर्चा केली. यावेळी श्री. गडकरी यांनी मंजूर केलेल्या विविध रस्ते प्रकल्पाची माहिती दिली. 

उदयनराजे म्हणाले, मंत्री गडकरी हे दिलेला शब्द खरा करण्याचा प्रयत्न नेहमीच करतात. त्यामुळे केंद्राच्या सेन्ट्रल रोड फंड योजनेत सातारा जिल्ह्यातील अनेक कामांचा समावेश होईल. त्याकरीता भरीव निधी मिळेल. आमच्या विनंती आणि आग्रहाखातर नितीन गडकरी यांनी आजपर्यंत जेव्हा जेव्हा संधी मिळेल. त्या त्या वेळी सातारा जिल्हयाकरीता विविध विकास कामांसाठी मंजूरी दिली आहे व निधीही दिला आहे.

ग्रेड सेपरेटरकरीता श्री. गडकरी आणि तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मोलाचे सहकार्य केल्यामुळेच सातारा सारख्या विकसनशील शहरात ग्रेडसेपरेटर सारखे देखणे आणि दूरगामी चांगला परिणाम करणा-या विकास कामाचे लोकार्पण करण्यात आले आहे. यापूर्वीही श्री. गडकरी यांनी सेन्ट्रल रोड फंड मधुन सातारा जिल्हयाकरीता सतत झुकते माप देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे यंदाच्या अंदाजपत्रकात सातारा जिल्हयातील जास्तीत जास्त विकास कामांचा समावेश केला जाणार आहे.


 

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT