Nitin Raut
Nitin Raut  Sarkarnama
मुंबई

पद काढून घेतलं अन् नितीन राऊतांनी दिलं उत्तर...

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : काँग्रसेचे नेते आणि राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांना पक्षाने शनिवारी मोठा धक्का दिला. राऊत यांची काँग्रेसच्या (Congress) अनुसूचित जाती विभागाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरुन गच्छंती करण्यात आली आहे. त्यांच्या जागी राजेश लिलौठिया यांना संधी देण्यात आली आहे. याबाबत आता राऊत यांनीच खुलासा करत पद काढून घेतल्याचे कारण सांगितले आहे.

राऊत यांची काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांच्या आदेशावरुन गच्छती करण्यात आल्याची चर्चा आहे. पद काढून घेतल्यानंतर राऊत म्हणाले, या पदाचा कार्यभार तीन वर्षाचा असतो. 27 मार्च 2018 ला माझी नियुक्ती झाली होती. त्यानंतर मी आमदार म्हणून निवडून आलो आणि मंत्री झालो. तेव्हाच मला हे पद सोडावे लागणार असल्याची चाहूल लागली होती. मात्र कोरोना साथीमुळे ते लांबले.

त्या काळात ओबीसी विभागाचे अध्यक्ष कमी करण्यात आले होते. मात्र माझं पद कायम होतं. आज योग्य व्यक्ती शोधून मला पद मुक्त केलं आहे. माझ्या कडे मंत्रिपद , पालकमंत्री पद आणि अनुसूचित जाती चा अध्यक्ष म्हणून सुद्धा काम होते. त्यामुळे मला काम करायला वेळ मिळत नव्हता. आता मला काम करायला वेळ मिळेल. मतदारसंघ आणि ऊर्जा विभागाकडे जास्त लक्ष देता येईल. आज मला विचारण्यात आलं तेव्हा मी होकार दिला आणि नवीन अध्यक्ष यांचं स्वागत केल्याचे राऊत यांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी विधानसभेच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर राऊत यांची अध्यक्षपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा होती. त्यावरुन गेल्या अनेक दिवसापासून नाना पटोले आणि नितीन राऊत यांच्यात पक्षांतर्गत वाद असल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान, विधानसभा अध्यक्षांंना कोणत्याही पक्षाच्या पदावर राहता येत नाही. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदी राऊत यांची नियुक्ती होणार असल्याचीही चर्चा सुरु आहे.

पुढील आठवड्यात अध्यक्षपदाची निवडणूक होणार आहे. यावर बोलताना राऊत म्हणाले, विधानसभा अध्यक्ष पदासाठी माझा विचार होत आहे, असं मला वाटत नाही. मला महाविकास आघाडी सरकार आलं तेव्हा अध्यक्ष पदासाठी विचारण्यात आलं होतं. मात्र मी मंत्रिपद मागितलं होतं.मला पक्षासाठी काम करता येईल, म्हणून मी मंत्रिपद मागितलं. त्यामुळे आता असं काही होईल असं मला वाटत नाही, असंही राऊत यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT