Mira Bhayandar Crime News: एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर वारंवार बलात्कार आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नगरसेवकावर करण्यात आला आहे. त्यामुळे मिरा-भाईंदर शहरातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
भाजपचे नगरसेवक लक्ष्मण जंगम यांच्यावर एका महिलेने हे आरोप केले आहेत. जंगम यांच्या विरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६९ आणि ३५१(२) अंतर्गत मिरा रोड पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.
तिच्या तक्रारीवरून भाईंदर येथील नवघर पोलीस ठाण्यात जंगम यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी नगरसेवकावर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. पोलीस या प्रकरणात अधिक पुरावे गोळा करत असून पुढील तपास सुरु आहे.
लक्ष्मण जंगम यांनी तिच्याशी जवळीक साधून लग्नाचे खोटे आश्वासन दिले होते. या आश्वासनाच्या जोरावर त्यांनी २०१५ पासून ते आतापर्यंत वेळोवेळी कार्यालयात, लॉजवर आणि विविध ठिकाणी तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले.
जेव्हा पीडितेने लग्नासाठी तगादा लावला, तेव्हा जंगम यांनी तिला टाळण्यास सुरुवात केली आणि लग्नास नकार दिला, असे पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांत किंवा याबाबत इतर कोणालाही सांगितल्यास महिलेला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.