pratap sarnaik Congress sarkarnama
मुंबई

Congress-Shivsena Alliance : मीरा-भाईंदरमध्ये मोठा ट्विस्ट, भाजपच्या विरोधात शिंदेंची शिवसेना-काँग्रेस एकत्र; सरनाईकांनी म्हणाले,'पाशवी बहुमत...'

City Development Front Mira-Bhayandar : शिंदेंच्या शिवसेनेनेने धक्कातंत्राचा अवलंब करत काँग्रेसची हात मिळवणी करुन नवी आघाडी स्थापन केली आहे.

Roshan More

प्रकाश लिमये

Mira-Bhayandar News : मीरा-भाईंदर महानगरपालिकेत विरोधी पक्षात असलेले शिवसेना शिंदे गट व काँग्रेस एकत्र आले आहेत. या दोन्ही पक्षांच्या नगरसेवकांनी  मिळून मिरा भाईंदर शहर विकास आघाडीची स्थापना केली आहे. गुरुवारी या गटाची कोकण विभागीय आयुक्तांकडे नोंदणी करण्यात आली आहे.

काँग्रेसच्या नगरसेवकाकाडे या आघाडीचे गटनेतेपद आहे. यामुळे राज्यात आणखी एक राजकीय समीकरण अस्तित्वात आले आहे. या समीकरणामुळे शिवसेनेचा एक स्वीकृत सदस्य निवडला जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

कल्याण डोंबिवलीत शिवसेना शिंदे गट व मनसे एकत्र येत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजकीय धक्का दिला होता. मीरा भाईंदर महापालिकेतही शिंदे सेनेने धक्कातंत्राचा अवलंब करत काँग्रेसची हात मिळवणी करुन नवी आघाडी स्थापन केली आहे. वास्तविक या आघाडीमुळे महापालिकेतील सत्तेच्या गणितात कोणताही फरक पडणार नसला तरी शिवसेनेच्या पदरात मात्र एक स्वीकृत नगरसेवकपद पडणार आहे.

महापालिकेत ९५ पैकी ७८ जागा जिंकत भाजपने विक्रमी बहुमत मिळवले. शिवसेनेला केवळ तीन जागांवर समाधान मानावे लागले तर काँग्रेसने १३ जागा जिंकून आपल्या कामगिरीत किंचित सुधारणा केली. निवडणुकीनंतर गटाच्या नोंदणीची प्रक्रिया सुरू होते. त्यामुळे कोकण विभागीय आयुक्तांकडे भाजप, काँग्रेस व शिवसेना स्वतंत्र नोंदणी करतील अपेक्षा होती. मात्र स्वतंत्र नोंदणी केली तर शिवसेनेला स्वीकृत नगरसेवकाची एकही जागा मिळणार नव्हती.

स्वीकृत सदस्यांची संख्या आता पाच वरून नऊ झाली आहे. तिन्ही पक्षांनी स्वतंत्र नोंदणी केली असती तर नऊ पैकी भाजपचे आठ स्वीकृत सदस्य निवडून गेले असते व काँग्रेसचा एक स्वीकृत नगरसेवक झाला असता. शिवसेनेला मात्र काहीच मिळाले नसते. मात्र काँग्रेस व शिवसेनेने हातमिळवणी करत मिरा भाईंदर शहर विकास आघाडीची स्थापना केल्याने दोघांची एकत्रित संख्या १६ झाली आहे.

आघाडीचे दोन नगरसेवक वाढणार

परिणामी स्वीकृत नगरसेवकांच्या आकडेवारीनुसार आता भाजपचा एक स्वीकृत नगरसेवक कमी होऊन त्यांचे सात स्वीकृत नगरसेवक होतील व आघाडीचे दोन स्वीकृत नगरसेवक होतील. त्यातील एक स्वीकृत नगरसेवक शिवसेनेला मिळेल.

याआधी निवडणुकीतही काँग्रेस व शिवसेनेची छुपी युती झाली असल्याचा आरोप भाजपने केला होता. या नव्या समीकरणाने राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होतील हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

...म्हणून आघाडीची स्थापना

आम्ही काँग्रेस सोबत गेलेलो नाही. दोन्ही पक्षाच्या  नगरसेवकांनी एकत्र येत स्वतंत्र आघाडी स्थापन केलेली आहे. विरोधी पक्षांची एकत्रित मते भाजपपेक्षा कितीतरी अधिक आहे. भाजपला मिळालेल्या राक्षसी बहुमताचा वापर करून चुकीची कामे होऊ नयेत यासाठी ही आघाडी स्थापन करण्यात आली आहे, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT