Bachchu Kadu
Bachchu Kadu Sarkarnama
मुंबई

Bachchu Kadu: प्रशासनातील अफजलखानाचा शोध घेऊन ठोकून काढणार; बच्चू कडू संतापले

Pradeep Pendhare

माजी मंत्री, आमदार बच्चू कडू प्रशासनावर चांगलेच भडकले आहेत. राज्यातील दिव्यांग आणि शेतकऱ्यांबाबत प्रशासनाकडून होत असलेल्या दुजाभावावर बच्चू कडू (Bachchu Kadu) संतापले. "प्रशासनातील अफजलखान कोण? या अफजलखानाचा शोध घेऊन ठोकून काढणार", असा थेट इशारा त्यांनी दिला आहे.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांनी सरकारपेक्षा प्रशासनाला टार्गेट केले. मुंबई मंत्रालयाच्या परिसरातून त्यांनी तिखट शब्दात दिलेला हा इशारा चर्चेत आला आहे.

आमदार बच्चू कडू आज दुपारी विधिमंडळाच्या कामकाजात सहभागी झाले. यावेळी त्यांनी प्रशासनाकडून होत असलेल्या दुजाभावावर बोट ठेवले. संताप व्यक्त केला. प्रशासनाला अफजलखानाची उपमा देत ठोकून काढणार, अशी भाषा वापरली. दोन वर्ष शांत होतो. कोणाच्या कानफाडात मारली नाही. परंतु आता वेळ आली आहे, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला. प्रशासनातील झारीतील शुक्राचार्य कोण आहे? त्याचा मी शोध घेत आहे. त्याला दुजाभाव करणे महागात पडणार आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटले.

राज्यात दिव्यांग खेळाडूंना प्रशासनाकडून दुजाभाव केला जातो. जनरल आणि इतर खेळाडू यांच्यापेक्षा दिव्यांग खेळाडू खूप मेहनत करतात. परंतु सुवर्णपदक मिळवल्यानंतर इतर आणि जनरल खेळाडूला सरकारकडून एक कोटी दिले जातात आणि दिव्यांग खेळाडूला 30 लाख रुपये दिले जातात. हा अफजलखानाच्या औलादीचा प्रकार आहे. तो खपवून घेणार नाही. प्रशासनातील दुजाभाव करणारा हा अफजलखान कोण? याचा मी शोध घेत आहे. तो मिळाल्यास त्याला ठोकून काढणार, असा इशारा बच्चू कडू यांनी दिला.

राज्यातील शेतकऱ्यांना केलेली वीज माफी ही पुरेशी नाही. कोरडवाहू शेतकऱ्यांना वीज माफीपेक्षा अतिरिक्त रक्कम मदत म्हणून दिली पाहिजे. राज्यात शहरे आणि ग्रामीण भागात विषमता वाढत आहे. तसं सरकारकडूनच या विषमतेला खतपाणी घातले जात आहे. 75 वर्षात काँग्रेसने जे पाप केले, तेच हे सरकार करीत आहे. पूर्वी जातीवाद होता आता आर्थिक वाद निर्माण झाला आहे, असे कडू म्हणाले.

राज्य सरकारकडून मिळणारी वीज,पाणी आणि मदत यात शहरी आणि ग्रामीण, अशी विषमता केली जात आहे. प्रशासनातील लोकांना वेळेवर पगार होतात. परंतु दिव्यांग यांचे चार महिन्यापासून पगार नाही. मेळघाटातील मजूर लोकांचे पगार नाहीत. हा दुजाभाव प्रशासनाला महागात पडेल, असेही बच्चू कडू यांनी म्हटले. दोन वर्ष झाले कोणाच्या कानफाडात मारली नाही. परंतु ती वेळ आली आहे. प्रशासनातील झारीतील शुक्राचार्य शोधून त्याला ठोकून काढणार असल्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT