मुंबई: शिवसेना नेते आणि राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केले आहे. आपल्यासोबत ३५ आमदार आहेत असा दावा देखील शिंदेंनी केला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) त्यांनी प्रस्ताव दिला आहे.
यावर अपक्ष आमदार देवेंद्र भुयार (devendra bhuyar) यांनी भाष्य केलं आहे. "एकनाथ शिंदे हे अतिशय प्रामाणिक,सर्वाधिक काम करणारे मंत्री आहेत. ते काही चुकीचं करतील अस वाटत नाही," असे भुयार यांनी सांगितलं. (Eknath Shinde News in Marathi)
"सरकारला कुठलाही धोका नाही, कारण या सर्वांचा बाप सिल्वर ओकवर बसलेला आहे," असे सांगत भुयार यांनी महाविकास आघाडीला सरकारला धोका असल्याच्या चर्चा फेटाळून लावल्या.
"एकनाथ शिंदे (Eknath Shinde) हे आनंद दिघे यांचे शिष्य आहेत. गद्दारी त्यांच्या रक्तात नाही. ते काही चुकीचा निर्णय घेतील असं वाटत नाही असं वक्तव्य अपक्ष आमदार देवेंद्र भुयार (Devendra Bhuyar) यांनी केलं आहे. एकनाथ शिंदे हे अतिशय प्रामाणिक, सर्वाधिक काम करणारे मंत्री आहेत. ते काही काही चुकीचं करतील अस वाटत नसल्याचं भुयार यांनी सांगितलं.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे देखील आता आक्रमक झाले आहेत. शिवसेनेच्या विधीमंडळ गटनेते पदावरून एकनाथ शिंदे यांची हकालपट्टी करण्याचा निर्णय ठाकरे यांनी घेतला आहे. शिंदे यांच्या जागी अजय चौधरी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.