Mumbai News: शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रतेसंदर्भातील प्रकरणाचा अंतिम निकाल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर बुधवारी दुपारी 4 वाजता देणार आहेत. या निकालाला अवघे काही तास शिल्लक असतानाच घडामोडींना वेग आला आहे. या निकालाआधीच राजकीय प्रतिक्रिया येत आहेत. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनीही प्रतिक्रिया देत निकालाआधी सूचक विधान केलं आहे.
'सुप्रीम कोर्टाने घालून दिलेल्या निकषांच्या आधारावर कायद्याला धरून हा निकाल असेल. दहाव्या परिशिष्टातील काही बाबींचाही निकालात आढावा घेण्यात आला असल्याने बेंचमार्क ठरेल. या निकालातून सर्वांना न्याय मिळेल', असं नार्वेकर म्हणाले आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
'आजचा निकाल हा मुलभूत हक्कासंदर्भातला महत्त्वाचा निकाल असेल. यामध्ये कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत. कायद्याचे तंतोतंत पालन केले जाईल, तसेच या निकालामधून सर्वांना न्याय मिळेल. निकालामध्ये कायद्याच्या दहाव्या अनुसूचीमधील कलमांचा योग्य प्रकारे वापर करण्यात येणार आहे. या निर्णयात कोणत्याही त्रुटी राहणार नाहीत', असंही नार्वेकर म्हणाले.
दरम्यान, आमदार अपात्रता प्रकरणाच्या निकालाला काही तास शिल्लक असल्यामुळे शिवसेना ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गटाची धाकधूक वाढली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही अपात्रतेची टांगती तलवार आहे. या संपूर्ण प्रकरणाकडे देशाचं लक्ष लागलं असून निकाल काय येतो, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.
ठाकरे गटाचे नेते, आमदार आदित्य ठाकरे यांनीही यावर प्रतिक्रिया देत 'पक्षासाठी नव्हे तर देशासाठी हा निकाल महत्वाचा आहे. नार्वेकरांनी त्यांच्या पदाची बदनामी करू नये, संविधानानुसार निर्णय द्यावा. संविधानानुसार 16 आमदार अपात्र झाले पाहिजेत, असं आदित्य ठाकरे म्हणाले.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.