prasad Lad

 

Sarkarnama

मुंबई

राणेंविरोधातील पोस्टरवरून भाजप आक्रमक : प्रसाद लाडांची पोलिसांत धाव!

संबंधित व्यक्ती आणि यामागील सूत्रधार यांचा शोध घ्यावा

सरकारनामा ब्यूरो

मुंबई : शिवसेनेचे (Shivsena) कार्यकर्ते संतोष परब (Santosh Parab) हल्ला प्रकरणात नाव असलेले भाजपचे (BJP) आमदार नीतेश राणे (Nitesh Rane) हे गेल्या काही दिवसांपासून गायब आहेत. त्यांचा अटकपूर्व जामीन अर्जही जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला. गायब राणे यांच्याविरोधात मुंबईत पोस्टरबाजी करण्यात आली आहे, त्याविरोधात भाजपने आवाज उठवला असून माटुंगा पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. (MLA Prasad Lad complaint with police regarding poster case against Nitesh Rane)

भारतीय जनता पक्षाचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांनी मुंबईतील माटुंगा पोलिस ठाण्यात ही तक्रार दाखल केली आहे. लाड म्हणाले की, आमदार नीतेश राणे यांच्या विरोधात सायन-माटुंगा परिसरात पोस्टर लावणाऱ्या व्यक्तीवर कारवाई झाली पाहिजे. तसेच, या पोस्टरबाजीच्या मागील बोलविता धनी कोण आहे, हेदेखील शोधले पाहिजे. त्याकरिता माटुंगा पोलिस ठाण्यात मी तक्रार दाखल केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणूक प्रचारकाळात शिवसैनिक संतोष परब यांच्यावर खुनी हल्ला झाला होता. त्या प्रकरणी आमदार नीतेश राणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. जिल्हा बॅंकेच्या ऐन निवडणुकीच्या प्रचाराच्या काळापासून नीतेश राणे नॉट-रिचेबल आहेत. त्यांचा अटकपूर्व जामीनअर्जही सत्र न्यायालयाने फेटाळला आहे. त्यानंतर मुंबईसह ठाण्यात नीतेश राणे यांचे छायाचित्र असलेले ‘हरवला आहे’ अशी पोस्टर लागली आहेत.

दरम्यान, राणे यांच्याविरोधात लागलेल्या या पोस्टरवरून भारतीय जनत पक्ष आक्रमक झाला आहे. ही पोस्टर लावणाऱ्या व्यक्तीविरोधात कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी करत आमदार प्रसाद लाड यांनी सायन माटुंगा पोलिस ठाण्यात धाव घेतली आहे. संबंधित व्यक्ती आणि यामागील सूत्रधार यांचा शोध घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. आमदार लाड यांच्यासोबत कालिदास कोळंबकर तसेच भाजपचे पदाधिकारी या वेळी होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT