Radheshyam Mopalwar Sarkarnama
मुंबई

Video Radheshyam Mopalwar: महामार्गात मोपलवारांची 'समृध्दी'; कमावली 3 हजार कोटींची माया; रोहित पवारांनी आकडेवारीच सांगितली

Rohit Pawar ON Samruddhi Mahamarg Project Radheshyam Mopalwar "26 वर्षांच्या काळात 3 हजार कोटींची माया मोपलवार यांनी जमा केली. त्यांनी याबाबतीत उद्योगपती अदानी व अंबानींनाही मागे टाकले आहे.

Mangesh Mahale

राज्य सरकारचा महत्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या समृद्धी महामार्गाच्या बांधणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे सनदी अधिकारी राधेश्याम मोपलवार (Radheshyam Mopalwar) यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. 'समृद्धी'च्या बांधणीत मोपलवार यांनी कोट्यवधीची माया कमावली, असा आरोप रोहित पवार यांनी केला आहे.

रोहित पवार यांनी मोपलवार यांच्या कथित गैरव्यवहाराचा मुद्दा सविस्तरपणे मांडला. त्यांचे ठोस पुरावे आपल्याकडे असल्याचा दावा त्यांनी केला आहे. "26 वर्षांच्या काळात 3 हजार कोटींची माया मोपलवार यांनी जमा केली. त्यांनी याबाबतीत उद्योगपती अदानी व अंबानींनाही मागे टाकले आहे,असे रोहित पवार म्हणाले.

'समृद्धी' सामान्यांची की अधिकाऱ्यांची?

मोपलवार (Radheshyam Mopalwar) निवृत्त झाल्यानंतरही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना आपल्या वॉररुमचे प्रमुख बनवले. मोपलवार यांची देशात आणि देशाबाहेर 3000 कोटी रुपयांची मालमत्ता आहे. 4 महिन्यात पुन्हा टेंडर काढण्यात आले, त्यामध्ये वाढीसाठी मंजुरी देण्यात आली. तेव्हा हे टेंडर 55 हजार कोटीवर गेले. त्यामुळे समृद्धी सामान्य माणसाची झाली की अधिकाऱ्यांची झाली, हे दिसते, असे रोहित पवार यांनी माध्यमांना सांगितले.

मोपलवार आजघडीला देशातील श्रीमंत सरकारी अधिकारी म्हणून ओळखले जातात. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देश दिले. पण 2018 मध्ये तत्कालीन मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी त्यांच्यावर तात्पुरती कारवाई केली. त्यानंतर त्यांच्याच खांद्यावर मोठी जबाबदारी दिली, असे रोहित पवार म्हणाले.

दोन बायकांकडे 450 कोटींची संपत्ती, मुलींकडे 850 कोटींची संपत्ती

रोहित पवार यांनी मोपलवार कुटुंबियांकडे किती संपत्ती आहे, याची आकडेवाडीच सांगितले. त्यांच्या एका बायकोकडे 150 कोटी, तर दुसऱ्या बायकोकडे 300 कोटींची संपत्ती आहे. एवढेच नाही तर त्यांच्या एका मुलीकडे 500 कोटी, दुसऱ्या मुलीकडे 350 कोटी व त्यांचा भाऊ सदानंद मोपलवार यांच्याकडे 200 कोटींची संपत्ती असल्याचा दावा रोहित पवार यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT