Rohit Pawar Today Press Conference on Black Box Sarkarnama
मुंबई

Ajit Pawar Death: अजितदादांचा अपघात की घात? रोहित पवार आज नवे पुरावे देणार; Black Box बाबत गोप्यस्फोट करणार?

Rohit Pawar Today Press Conference on Black Box: अजित पवार यांच्या विमान अपघाताला मृत्यू होऊन 22 दिवस होऊन या अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला नसल्याचे रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

Mangesh Mahale

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते, आमदार रोहित पवार यांची आज मुंबईतील यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये पत्रकार परिषद आहे. दिवंगत अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत ते काही पुरावे सादर करणार असल्याची शक्यता आहे.

अजित पवार यांचा विमान अपघाताला 22 दिवस होऊन या अपघाताचा प्राथमिक अहवाल समोर आला नसल्याने रोहित पवार यांनी नाराजी व्यक्त केली आहे. या पत्रकार परिषदेत रोहित पवार आणखी काही पुरावे देणार असल्याची माहिती आहे.

अजित पवार यांचा अपघात नसून घातपात आहे, असे रोहित पवार यांनी सांगितले असून या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. सध्या सुरु असलेलल्या तपासावर त्यांनी काही आरोप केले असून काही प्रश्न उपस्थित केले, तर काही मागण्याही केल्या आहेत. रोहित यांनी हा विषय लावून धरला आहे. त्यामुळे राजकीय वर्तुळासह सामान्य नागरिकांच्या मनात अजितदादांचा अपघात की घातपात हा प्रश्न आहे.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरण्याच्या चर्चा आता थांबल्या असून अपघाताची चौकशी होणे हेच महत्वाचे आणि यावरच आमचा फोकस आहे, असेही रोहित पवार यांनी काल (मंगळवार) म्हटले होते. रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेत थेट अजित पवार यांच्या निधनानंतर मोठा संशय व्यक्त केला. खासगी गुप्तहेर संस्थेकडून अजित पवार यांच्या विमान अपघाताची चाैकशी केली जात असल्याचीही माहिती पुढे येत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार बजरंग सोनवणे यांनी अजितदादांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त केला आहे. अजितदादांच्या विमानात बाँम्बसारखी काही वस्तू असू शकेल, अशा संशय सोनवणे यांनी व्यक्त केला आहे.

सगळ्यांच्या मनात शंका आहे, असे का घडलं असावं याबाबत रोहित पवार आज माध्यमांना माहिती देणार आहे. Ajit Pawar यांच्या विमानातील Black Box बाबत रोहित पवार करणार आज काय गोप्यस्फोट करणार याकडे सगळ्याचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT