Gopichand Padalkar News, Vidhan Parishad election 2022 News
Gopichand Padalkar News, Vidhan Parishad election 2022 News  sarkarnama
मुंबई

Vidhan Parishad : आज कोणी पावसात कितीही भिजले तरी त्याचा परिणाम होणार नाही!

सरकारनामा ब्युरो

मुंबई : विधान परिषदेच्या 10 जागांसाठी (Vidhan parishad election 2022) आज मतदान होत आहे. राज्यसभेच्या निवडणुकीनंतर आता विधान परिषदेचा निकाल काय येतो याची आतुरता सर्वाना लागली आहे. (gopichand padalkar latest news)

राज्यसभेच्या निवडणुकीत झालेल्या दगाफटक्यानंतर महाविकास आघाडी सावध झाली आहे. तर भाजपने देखील या निवडणुकीतही चमत्कार करून दाखवण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी विधानभवन परिसरात महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. (Vidhan Parishad election 2022 News)

गोपीचंद पडळकर म्हणाले, "विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे पाचही उमेदवार निवडून येतील. आज कोणी पावसात कितीही भिजले तरी त्याचा परिणाम होणार नाही. पुढच्या तीन ते चार तासांमध्येच सर्व चित्र स्पष्ट होईल," पडळकरांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यावर भाष्य केलं.

"महाविकास आघाडीमध्ये काहीतरी गोंधळ उडाला आहे. त्यामुळेच ते वारंवार बैठका घेत आहेत. अपक्ष हे भाजपच्याच बाजूने राहतील. कारण शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अपक्षांची कितीतरी वेळा अब्रु घालवली आहे. त्यामुळे अपक्षांची नाराजी मतदानातून निश्चितरित्या उमटली जाईल," असे पडळकर म्हणाले.

शरद पवार यांची साताऱ्यात भर पावसात सभा झाली होती. अंगावर पावसाच्या सरी कोसळत असतानाही शरद पवारांनी आपलं भाषण न थांबवता सत्ताधाऱ्यांवर टीका केली. या सभेत राष्ट्रवादीचा विजय झाला होता. पडळकरांच्या या विधानामुळे पवारांच्या या पावसाच्या सभेची अनेकांना आठवण झाली.

सकाळी 9 वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. दुपारी 4 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. त्यानंतर मतमोजणी संध्याकाळी 5 वाजता सुरू होणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT