मुंबई : भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानभवनातील भेटीगाठींनी राजकीय चर्चांना उधाण आलं आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतली. त्यानंतर आता ते सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांनाही भेटल्याचा व्हिडीओ समोर आला आहे.
विधान परिषदेच्या निवडणुकीचे मतदान जवळपास पूर्ण झाले आहे. महाविकास आघाडी विरूध्द भाजप असा थेट सामना आहे. आघाडीतील फुटीर मतांवरच भाजपच्या पाचव्या उमेदवाराचे भवितव्य अवलंबून आहे. त्यामुळे तीनही पक्षांकडून विशेष दक्षता घेतली जात आहे. (BJP Leader Chandrasekhar Bawankule meets Dhananjay Munde)
त्यातच मतदानाची प्रक्रिया सुरू असताना बावनकुळे यांनी अजित पवारांची त्यांच्या दालनात जाऊन भेट घेतल्याचे समोर आले. अजितदादांसोबतची आपली भेटी ही राजकीय नव्हती. तर ती मतदारसंघातील कामांसदर्भात होती, असे स्पष्टीकरण आमदार बावनकुळे यांनी भेटीबाबत दिले आहे होते.
पण त्यानंतर बावनकुळे हे धनंजय मुंडे यांनाही विधान भवन परिसरात भेटल्याचे व्हिडीओ समोर आले आहेत. बावनकुळे हे सुरूवातीला मुंडेंच्या कानात कुजबुजल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. नंतर दोघांनाही काही वेळ बोलणेही झाले. त्यानंतर बानवकुळे यांनी मुंडेंचा निरोप घेतल्याचे व्हिडीओमध्ये दिसते. त्यामुळे मतदानावेळीच बावनकुळे हे राष्ट्रवादीच्या दोन नेत्यांना भेटल्याने तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहेत.
दरम्यान, सध्या विधान परिषदेसाठी अटीतटीची निवडणूक सुरू आहे. एकेक मतासाठी दोन्ही बाजूकडून ओढाओढ सुरू असताना बावनकुळे अचानक अजित पवार यांच्या भेटीसाठी आले होते. बावनकुळे हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील म्हणून ओळखले जातात. त्यांच्या अजितदादांच्या भेटीला येण्याने अनेकांच्या भूवया उंचावल्या आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.