Sadabhau Khot News, Devendra Fadnavis News, Vidhan Parishad Election 2022 News Sarkarnama
मुंबई

सदाभाऊ खोत यांची माघार; भाजपचे पाच उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात

विधान परिषदेच्या निवडणुकीत जोरदार रस्सीखेच

सरकारनामा ब्युरो

Vidhan Parishad Elelction 2022

मुंबई : विधान परिषदेच्या निवडणुकीत भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार सदाभाऊ खोत यांनी माघार घेतली आहे. त्यामुळे आता भाजपेच पाच अधिकृत उमेदवार रिंगणात राहिले आहेत. अर्ज मागे घेण्यासाठी काही मिनिटांचाच वेळ उरलेला असताना त्यांनी अर्ज मागे घेतला. यामुळे आता निवडणूक होणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले आहे.

राज्यात दहा जागांसाठी 20 जून रोजी मतदान होणार आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे. दहा जागांसाठी बारा उमेदवारांनी अर्ज भरला होता. राज्यसभा निवडणूक जिंकल्यानंतर विधान परिषदेसाठी भाजप ची तयारी करण्यात आल्याचे सुरूवातीपासून सांगितले जात होते. सहाही उमेदवार जिंकतील असा दावा नेत्यांकडून केला जात होता. पण सदाभाऊ खोत यांनी अर्ज मागे घेतला आहे.

विधान परिषदेबद्दल देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली काही वेळापूर्वीच भाजपची बैठक झाली. या बैठकीत खोत यांनी माघार घेण्याबाबतचा निर्णय झाल्याचे समजते. त्यानुसार खोत काही वेळापूर्वीच विधान भवनात दाखल झाले होते. त्यानंतर त्यांनी आपला अर्ज मागे घेतला आहे.

सदाभाऊ खोत यांनी आज विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. जवळपास 15 मिनिट दोन्ही नेत्यांमध्ये भेट झाली होती. एका जागेसाठी 27 मतांचा कोटा आहे. भाजपचे संख्याबळ पाहता चार उमेदवार सहजपणे निवडून येऊ शकतात. पण त्यानंतरही भाजपने सहा उमेदवार दिले होते.

राज्यसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला आता विधान परिषद निवडणुकीचं गणित सतावू लागलं आहे. या निवडणुकीतही आकडे भाजपच्या बाजूने नसले तरी सहा उमेदवार देण्यात आले होते. तर आघाडीचेही सहा उमेदवार रिंगणात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT