मुंबई : राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) उमेदवाराचा पराभव झाला. त्यावरून आता विधान परिषदेच्या निवडणुकीत आघाडीत धुसफूस पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या उमेदवाराला मिळालेल्या अतिरिक्त मतांवरून शिवसेना आमदारांमध्ये नाराजी असल्याचे सांगितले जात आहे. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसकडून या निवडणुकीत शिवसेनाला मदत मिळाली नाही, असा दावा करत आता शिवसेनेतील काही आमदार विधान परिषदेत केवळ आपल्याच उमेदवारांना मतं देण्याच्या बाजूने असल्याचे सांगितले जात आहे. (Legislative Council Election Latest Marathi News)
सोमवारी (२० जून) होणाऱ्या विधानपरिषद निवडणुकीसाठी (Legislative Council Election) महाविकास आघाडी एकत्र असल्याचा दावा तीनही पक्षांकडून केला जात आहे. पण प्रत्यक्षात प्रत्येक पक्ष आपल्या उमेदवारांच्या विजयासाठी प्रयत्न करत असल्याचे चित्र आहे. इतर घटक पक्ष व अपक्षांच्या मतांवर काँग्रेस व राष्ट्रवादीचा डोळा आहे. तर शिवसेनेकडील अतिरिक्त चार मतंही या दोन पक्षांना हवी आहेत.
शिवसेनेचे दोन्ही उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. त्यानंतरही त्यांच्याकडे चार मतं उरतात. काँग्रेसला दहा तर राष्ट्रवादीला एका मताची गरज आहे. त्यामुळे दोन्ही पक्षांकडून शिवसेनेच्या अतिरिक्त मतांसाठी प्रयत्न सुरू आहेत. पण शिवसेनेचे काही आमदार ती चार अतिरिक्त मत शिवसेनेच्या उमेदवारांना देण्याचा बाजूने असल्याची चर्चा आहे.
राज्यसभेच्या निवडणुकीत दोन्ही काँग्रेसकडून शिवसेनेला मदत झाली नाही. काँग्रेसला निश्चित कोट्यापेक्षा तीन तर राष्ट्रवादी दोन अतिरिक्त मतं मिळाली होती. त्यामुळे आता या निवडणुकीतही केवळ शिवसेनेच्या उमेदवारांनाचं मतं द्यायची, अशी भूमिका काही जणांनी घेतल्याचे समजते. तसं झाल्यास त्याचा मोठा फटका काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप यांना बसू शकतो. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे काय आदेश देणार, याकडे आमदारांचं लक्ष लागलं आहे.
दरम्यान, महाविकास आघाडीच्या तिन्ही पक्षाच्या आमदारांना तीन वेगवेगळ्या हॉटेल्समध्ये मुंबईत ठेवण्यात आले आहे. दुसरीकडे भाजपनेदेखील (BJP) आपले आमदार जमवले आहे. चारही पक्ष आकडेमोडीमध्ये व्यस्त आहेत. राज्यसभा निवडणुकीमुळे आघाडीकडून यावेळी खबरदारी घेतली जात आहे. आमदारांना मतदानाची प्रक्रिया समजावून सांगितली जात असून पक्षातील मोठ्या नेत्यांकडून मार्गदर्शन केले जात आहे.
राष्ट्रवादीच्या आमदारांचा मुक्काम हॉटेल ट्रायडेंटमध्ये आहे. त्यांना राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी मार्गदर्शन केले. शिवसेनेचे आमदार हॉटेल वेस्ट इनमध्ये असून मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) तसेच खासदार संजय राऊत, एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेचे बडे नेते येथे उपस्थित आहेत. विशेष म्हणजे, आज शिवसेनेचा वर्धापन दिनदेखील येथेच साजरा होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आमदार तसेच शिवसैनिकांना मार्गदर्शन करणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.