मुंबई

पवार, राऊतांच्या टीकेला राज ठाकरे देणार 'करारा जबाब' ; मनसेचा टीझर रिलीज

सभेपूर्वी मनसेकडून एक टीझर रिलीज

सरकारनामा ब्युरो

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS)अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray)यांची १२ एप्रिल रोजी ठाणे येथील गडकरी रंगायतनजवळ सायंकाळी 6.30 वाजता होणार असल्याचे मनसेने जाहीर केले आहे. सभेपूर्वी मनसेकडून एक टीझर रिलीज करण्यात आला आहे. मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एक टि्वट करुन या सभेचा टीझर रिलीज केला आहे.

मनसेच्या शेअर केलेल्या टीझरमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार संजय राऊत आणि शरद पवार यांनी केलेल्या प्रतिक्रिया दाखविल्या आहेत. या सर्व टीकांना राज ठाकरे करारा जबाब देणार असं म्हटलं आहे.

मनसेचे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी एक व्हिडिओ समाजमाध्यमांवर शेअर करीत यासभेविषयी माहिती दिली होती. या व्हिडिओमध्ये संदीप देशपांडे म्हणतात, ''शिवतीर्थावर झालेल्या राज ठाकरे यांच्या भाषणानंतर अनेकांना मिरच्या झोंबल्या. पण काहींनी त्यावरुन अनेक समज-गैरसमज करुन घेतले. त्यामुळे ठाणे येथे होणारी सभा ही एका अर्थाने 'उत्तरसभा' असणार नाही. आपल्या परंपरेत कोणतीही एखादी मोठी पूजा घातली की त्यानंतर उत्तरपूजा केली जाते. तशीच आता शिवाजी पार्क मैदानावरील राज ठाकरे यांच्या सभेनंतर ठाणे येथे 'उत्तरसभा' घेतली जाईल,''

''मशिदीवरील भोंगे राज्य सरकारनं हटवावे, नाहीतर मनसे कार्यकर्ते ते हटवतील. त्याविरोधात हनुमान चालीसा पटण देखील केले जाईल, असे राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या सभेत म्हटलं आहे. त्याचे पडसाद अद्यापही राज्यात उमटत आहेत. मनसे पदाधिकाऱ्यामध्येही याबाबत मतभेद आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT