Raj Thackeray Announced MNS Manifesto Sarkarnama
मुंबई

Raj Thackeray : सत्तेत येण्याची खात्री आहे का? हे जाहीरनामा प्रसिद्ध केलेल्यांना विचारा! राज ठाकरेंनी '19 वर्षांत काय केलं...

Raj Thackeray Announced MNS Manifesto 2024: . मराठी भाषा, महिला सुरक्षा, राज्यातील मुलभूत गरजांचा समावेश यात आहे. जाहीरनामा सर्वसामान्य जनतेचा असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.

Mangesh Mahale

MNS News: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा जाहीरनामा पक्षाचे प्रमुख राज ठाकरे यांनी आज प्रसिद्ध केला. 'आम्ही हे करू' असे नाव असलेली पुस्तिका मनसेने प्रसिद्ध केली आहे. मनसेच्या जाहीरनाम्यात मूलभूत गरजा आणि जीवनमान याला प्राधान्य दिले आहे.

मराठी भाषा, महिला सुरक्षा, राज्यातील मुलभूत गरजांचा समावेश यात आहे. जाहीरनामा सर्वसामान्य जनतेचा असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे. यावेळी त्यांनी आपण 19 वर्षात काय केलं याची पुस्तिका काढली असल्याचंही सांगितलं. सत्तेत येण्याची खात्री आहे, हे जाहीरनामा प्रसिद्ध केलेल्यांना विचारा, असा टोला राज ठाकरेंना सर्व पक्षांना लगावला.

2014 मधील ब्ल्यू प्रिंटमधील अनेक विषयांचा या जाहीननाम्यात समावेश आहे. इतर पक्षांनी आम्ही काय करु असे आपल्या जाहीरनाम्यात सांगितले आहे,पण आम्ही ते कसं करु हे सांगितले आहे.

2006-2014 दरम्यान आम्ही ब्ल्यू प्रिंट प्रसिद्ध केली होती, त्यावरुन मला हिणवलं गेले. त्यामध्ये काय आहे हे मला माध्यमांनीही विचारले नाही. त्या ब्ल्यू प्रिंटमधल्या अनेक गोष्टींचा समावेश आम्ही केला आहे कारण अनेक विषय आणि प्रश्न अजून बदलले नाहीत, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

कसा आहे जाहिरनामा

  • मराठी अस्मिता, मराठीचा दैनंदिन वापर, डीजिटल युगात मराठी, गड किल्ले संवर्धन

  • दळणवळण, पाण्याचे नियोजन, मोकळ्या जागा, पर्यावरण, इंटरनेट

  • महिला,आरोग्य, प्राथमिक शिक्षण, रोजगार

  • प्रगतीच्या संधी, राज्याचं औद्योगिक धोरण, आर्थिक धोरण, कृषी पर्यटन

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT